कसारा : शहापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक संघ आणि शहापूर तालुका शिक्षक सेना यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गुणवंत शिक्षकांचा सत्कार सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बा. ह. अग्रवाल विद्यालय कसाराचे अष्टपैलू कला शिक्षक सुनील सूर्यवंशी यांची देखील सत्कारमूर्ती म्हणून निवड झाली.
शहापुरातील म.ना.बरोरा माध्यमिक विद्यालयात सूर्यवंशी यांना ज्ञानालंकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वासिंदचे विठ्ठल भेरे तर प्रमुख पाहुणे म्हणून मल्लखांब-अर्जुन पुरस्कार विजेते उदय देशपांडे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर खाडे आदी उपस्थित होते. सुनील सूर्यवंशी यांना ज्ञानालंकार पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.