ठाणे: ठाण्यातील उद्योजक सुहास मेहता यांची ‘व्हीजेटीआय’च्या नियामक मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सुहास मेहता हे ठाण्यातील सुप्रसिद्ध एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीचे संचालक आहेत. उद्योजक आणि शिक्षणतज्ञ या प्रवर्गातून त्यांची या नियामक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. या मंडळाची मुदत तीन वर्षांची आहे.
वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय), माटुंगा ही संस्था अशासकीय अनुदानित संस्था आहे. मुंबईतील ही प्रमुख अभियांत्रिकी शिक्षण संस्था आहे.