आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा १३ वा सामना अफगाणिस्तान आणि गतविजेता इंग्लंड यांच्यात १५ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल.
इंग्लंड आणि अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने
इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांनी २०१५ आणि २०१९ दरम्यान एकमेकांविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी इंग्लंडने दोन्ही जिंकले आहेत. हे दोन एकदिवसीय सामने २०१५ आणि २०१९ विश्वचषकादरम्यान खेळले गेले. भारतात पहिल्यांदाच इंग्लंड आणि अफगाणिस्तान एकमेकांविरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहेत.
इंग्लंड | अफगाणिस्तान | |
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट) | ५ | ९ |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने (विजय) | २ | ० |
विश्वचषकात (विजय) | २ | ० |
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील इंग्लंड आणि अफगाणिस्तानची आतापर्यंतची कामगिरी
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांचा तिसरा सामना खेळला जाणार आहे. इंग्लंडने एक विजय आणि एक पराभव नोंदवला आहे, तर अफगाणिस्तानला अद्याप पॉइंट टेबलमध्ये आपले खाते उघडता आलेले नाही. अहमदाबाद येथे इंग्लंडचा न्यूझीलंडकडून आठ गडी राखून पराभव झाला आणि त्यानंतर बांगलादेशविरुद्ध त्यांनी धर्मशाला येथे १३७ धावांनी मात केली. दुसरीकडे, अफगाणिस्तानला धर्मशाला येथे बांगलादेशविरुद्ध (६ विकेट्सने) आणि दिल्ली येथे भारताकडून (८ विकेट्सने) पराभव स्वीकारावा लागला आहे.
इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान: संघ, दुखापती अपडेट्स, खेळण्याची परिस्थिती, हवामान आणि कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायची गरज आहे
संघ
इंग्लंडः जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियम लिव्हिंगस्टन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.
अफगाणिस्तान: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला ओमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.
दुखापती अपडेट्स
इंग्लंडचा धमाकेदार अष्टपैलू बेन स्टोक्सने पहिले दोन सामने खेळलेले नाहीत. त्याला नितंबाची दुखापती आहे. जर तो रविवारच्या सामन्याच्या आधी फिट झाला तर तो प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानला दुखापतीची काही चिंता नाही.
खेळण्याची परिस्थिती
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. इंग्लंड येथे आपला पाचवा एक दिवसीय सामना खेळणार आहे, त्यापैकी त्यांनी दोन जिंकले आणि दोन हरले आहेत. अफगाणिस्तान येथे आपला दुसरा एक दिवसीय सामना खेळेल. या विश्वचषकात भारताविरुद्ध त्यांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. हे ठिकाण या स्पर्धेतील तिसरा सामना खेळणार आहे. प्रथम आणि दुसरी फलंदाजी करणाऱ्या संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला आहे. मागील दोन सामन्यांमध्ये उच्च धावसंख्या नोंदवली गेली. अजून एक धावांच्या मेजवानीची अपेक्षा आहे.
हवामान
हवामान उबदार राहण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आच्छादन ४०% असेल आणि १% पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिमेकडून वारे वाहतील.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
इंग्लंडसाठी जो रूट महत्त्वाचा असेल. संघाच्या फलंदाजीची जबाबदारी त्याच्यावर असेल. आतापर्यंत त्याच्या दोन सामन्यांमध्ये त्याने ८० च्या सरासरीने आणि १०३ च्या स्ट्राइक रेटने १५९ धावा केल्या आहेत. रूट या विश्वचषकात इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्या मागे इंग्लंडचा आक्रमक सलामीवीर डेविड मलान आहे. या डाव्या हाताच्या फलंदाजाने आपल्या दोन सामन्यांमध्ये ७७ च्या सरासरीने आणि ११८ च्या स्ट्राईक रेटने १५४ धावा केल्या आहेत. गोलंदाजांमध्ये, डावखुरा उंच वेगवान गोलंदाज रीस टोपली लक्ष वेधून घेईल. बांगलादेशविरुद्धच्या त्याच्या मागील सामन्यात त्याने चार विकेट्स घेतल्या. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध त्याला संधी मिळाली नाही परंतु त्यानी आपल्या दुसऱ्या सामन्यात कमालीचे प्रदर्शन करून आपली जागा संघात पक्की केली आहे.

अफगाणिस्तानसाठी राशिद खान जो टी २० क्रिकेट मध्ये उतृष्ट गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी त्याला एक दिवसीय क्रिकेटमध्ये तसेच काहीतरी करावे लागेल. त्याचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. त्याच्या जादुई गोलंदाजीच्या जोरावर तो कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला त्रास देऊ शकतो. मात्र, या विश्वचषकात आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये त्याला फक्त दोन विकेट्स घेण्यात यश आले आहे. फलंदाजांमध्ये कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने मोठ्या मंचावर स्वत:ची घोषणा केली आहे. त्याने दोन सामन्यांत ९८ धावा केल्या आहेत आणि तो या स्पर्धेत त्याच्या संघासाठी आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: १५ ऑक्टोबर २०२३
वेळ: दुपारी २:०० वाजता
स्थळ: अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)