संजय केळकर यांच्या रॅलीला स्थानिकांचा जोरदार प्रतिसाद

ठाणे: भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांची रविवारी सकाळी जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीचा श्रीगणेशा रायगड गल्ली परिसरातील श्री गणेश मंदिरातील बाप्पाच्या दर्शनाने झाला.
रविवार असल्याने सुट्टीच्या दिवशी मतदारांशी संवाद साधल्याने या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे पाहण्यास मिळाले. याचदरम्यान महिलांनी त्यांचे औक्षण सुद्धा केले. पाचपाखाडी, चंदनवाडी, नामदेववाडी परिसरातून प्रत्येक घरातून महिला प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.
रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ही अद्भुत रॅली रायगड गल्ली भागातून सुरू झाली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार, अशोक राऊळ, माजी नगरसेविका रुचिता मोरे, शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार, भाजपचे शहर उपाध्यक्ष महेश कदम, प्रकाश राऊळ आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सारेच प्रचारात सहभागी झाले होते.

रायगड गल्ली परिसरातील श्री गणेश मंदिरातील गणेश बाप्पाचे दर्शन घेत, रॅलीला सुरुवात झाली. शिवांजली सोसायटी, लक्ष्मीनारायण सोसायटी समोरून, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल चौक, हिल टॉप, ठाणे दर्शन सोसायटी, टेकडी बंगला, ओपन हाऊस चौक, पाचपाखाडी, जनरल अरुण कुमार वैद्य पुतळा, सतरंज वेफर्स चौक, उत्सव हॉटेलवरून डावीकडे, आनंद सावली सोसायटी, पांचपाखाडी, खळे कंपाऊंड, सर्विस रोड मार्गे, साबळेवाडी नितीन कंपनी चौकवरून, नामदेव वाडीतील गावदेवी मंदिरात जाऊन गावदेवीचे दर्शन घेतले. तेथील गावदेवी सोसायटीमार्गे विसावा कट्टा चौक, “ठाण्याचा राजा” गोविंदा पथक कार्यालय चौकवरून डावीकडे, श्रीजी कॉम्प्लेक्सवरून नितीन जंक्शनला वळसा घेत प्रेस्टिज पार्क, येथून साईबाबा मंदिर दर्शन करून मीनल छाया सोसायटीकडून डाव्या बाजूने तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्या ठिकाणाहून पुढे चंद्रवदन सोसायटी, संतोषवाडी, हनुमान मंदीरातून दर्शन घेत, गणेशकृपा सोसायटीकडून गणेशवाडी, सोमय्या चाळ मार्गे पुढे रूपादेवी मंदीरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. तेथून शहीद उद्यानकडून डावीकडे, पाटील वाडी मार्गे सिद्धेश्वर तलाव सर्विस रोड डी.आर.कदम यांचे कार्यालय परिसरातून रमाबाई आंबेडकर उद्यान सर्विस रोड कॅडबरी जंक्शनवरून उजवीकडून लाईफ लाईन हॉस्पिटल चौकातून सिंगनगर, हंसनगर, परेरा नगर मार्गे माजी नगरसेवक अशोक राऊळ यांचे कार्यालय येथून एसटी वर्कशॉपमार्गे जोंधळीबाग, नूरी बाबा दर्गा रोड, रूपा देवी मंदिर चौक, संतोष साळुंखे कार्यालय, महेश कदम कार्यालय करत, गौरीशंकर सिद्धिविनायक मंदिर ठाणे महानगरपालिका चौक, कचराळी तलाव येथे रॅलीचा समारोप झाला.

या रॅलीत ठीक ठिकाणी केळकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. याचदरम्यान, स्लममधील महिलांनी प्रत्येक घरात जाऊन आम्ही प्रचार करणार असे केळकरांना विश्वास दिला. प्रत्येक सोसायटी आणि मंडळाकडून केळकरांनी ओवाळणी केली असून प्रत्येक सोसायटीकडून केळकरांना मतदान करण्याचे आश्वासित केले.