ठाणे : मोबाईल रिचार्जप्रमाणे प्रीपेड वीज मीटर धारकांना आधी आपल्या खात्यावर आगाऊ पैसे भरावे लागणार आहेत. रिचार्ज संपला तर वीज प्रवाह बंद करण्यात येणार आहे. या प्रीपेड मीटरला ठाण्यातून जोरदार विरोध होऊ लागला आहे.
ठाण्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जुने मीटर काढून प्रीपेड मीटर लावण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. खासगी कामगारांकडून हे काम करून घेतले जात आहे. हे मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मिटरमधील आगाऊ रक्कम संपली की घरातील बत्ती गुल होऊन वीज ग्राहकांना अंधारात बसावे लागणार आहे. सर्वसामान्य वीज ग्राहकांना हे सर्व अवघड होणार असून ही अन्यायकारक असल्याची भावना सर्व सामान्य वीज ग्राहकाची आहे.
स्वराज्य सामाजिक संस्था लोकमान्य नगर ठाणे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे महावितरण अधिकारी लोकमान्य नगर-सावरकर नगर विभाग यांना अन्यायकारक प्रीपेड मीटर लावण्यास विरोध असल्याचे पत्र देण्यात आले. जबरदस्तीने मीटर बसविण्याचा प्रयत्न केल्यास परिसरातील सर्व वीज ग्राहक, स्वराज्य सामाजिक संस्था आणि शिवसेना आंदोलनाच्या मार्गाने निषेध नोंदविणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
याप्रसंगी स्वराज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय देवकर, शिवसेना विभागप्रमुख राजीव शिरोडकर, प्रशांत सातपुते, नारायण भालेकर, चंद्रकांत पाटील, अशोक कुलकर्णी, आदित्य देवकर, परेश परब, शाहू कदम, विजय सावंत, हितेश साळुंखे, बाळा भाट, तलाश परब, अतुल धामापूरकर, संतोष रुमडे, तुकाराम वाडे, विश्वनाथ नायर, चंद्रकांत ससाणे, श्रीधर सकपाळ,अनिल चाळके, नरेंद्र तवटे, अनिल धुमाळ, साईनाथ सिंग, महेश केरकर तसेच महिला आघाडी शहर संघटक प्रमिला भांगे, भाग्यश्री लाड व हेमांगी पांचाळ आदी उपस्थित होते.