अगदी शाळकरी मुलांपासून ते प्रौढ व्यक्तींपर्यंत सगळ्यांचे जीवन खूप धकाधकीचे, घाईचे झाले आहे. त्यामुळे या दिवसभराच्या कामाच्या दगदगीतून आपण जेवणाकडे, पौष्टिक आहाराकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग केसांसाठी पोषक ठरणारे अनेक पदार्थ आपल्या शरीराला मिळतच नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे मग केस गळण्याची समस्या खूप वाढते. काही जणांचे केस तर एवढे गळतात की, अक्षरश: टक्कल पडतेय की काय अशी भीती वाटू लागते.
सध्याच्या काळात अनेकजण केसगळतीच्या समस्येने त्रस्त आहेत. केसगळतीचा (Hairfall) त्रास हा फक्त महिलांनाच नाही तर पुरुषांनाही होतो. त्यामुळे यावर वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे. आरोग्याच्या समस्या, ताणतणाव, आहार आणि चिंता यामुळे केस गळण्याची समस्या आजकाल वाढत चालली आहे.
हेअर फॉल होऊ नये म्हणून महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा :-
1. दररोज टाळूचा मसाज करा. खोबरेल तेल किंवा बदाम तेल आठवड्यातून दोन वेळा वापरावे.
2. आठवड्यातून दोनदा केस धुवा जेणेकरून टाळू आणि केस दोन्हीही स्वच्छ आणि स्वस्थ राहील.
3. हेअर ट्रीटमेंट जसे की, हेअर कलरिंग, हेअर स्ट्रेटनिंग, ब्लोड्रायर यांचा वापर जास्त करू नये. यामुळे केस खराब होतात.
4. संतुलित आहार घ्या. जसे की,अंडी, कडधान्य, मासे, बदाम, अक्रोड, सिड्स, पालेभाज्या, बीट, गाजर, रताळे, दही.
5. केस तुटतील किंवा ताणले जातील अशा पद्धतीने घट्ट केस बांधू नये.
6. Paraben आणि sulfate फ्री शाम्पू आणि कंडिशनरचा वापर करावा.
7. दर तीन महिन्यांनी खालून केस ट्रिम करावे.
8. ताण तणावामुळे हेअर फॉल होऊ शकतो त्यामुळे नेहमी योगा किंवा मेडिटेशन करावे.
9. दररोज दोन ते अडीच लिटर पाणी प्यावे. जेणेकरून तुमचे केस निरोगी राहतील.
10. धूम्रपान किंवा मद्यपान सेवन केल्याने केस कमकुवत होऊन हेअर फॉल होऊ शकतो.
डॉ. वृतीका शाह ( खिमासीया एम.बी.बी.एस/ ए.मडी/डी.एन.बी)
त्वचा, केस, कुष्ठरोग, वेनोरिओलाॅजी
संपर्क क्र :- ९३२१८३९२३१