ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल आणि विहंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनच्या सहकार्याने ठाण्यामध्ये अंध खेळाडूंची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा काल आणि आज २६ डिसेंबर रोजी ठाणे शहरातील सिंघानिया शाळेच्या रेमंड ग्राउंडवर या स्पर्धा पार पडल्या.
आज अंतिम सामन्यात पुणे संघाने गतविजेत्या अकोला संघास पराभूत करून विजय मिळवला. राज्यातले अंध क्रिकेटपटूंचे आठ विविध जिल्ह्यांचे संघ या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीने आणि इतर काही रोटरी क्लबच्या मदतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेस विशेष अतिथी म्हणून आमदार प्रताप सरनाईक, विहंग ट्रस्टच्या परीषाताई सरनाईक, रोटरीचे माजी प्रांतपाल डाॅ. मोहन चंदावरकर, शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते.
१२०हून अधिक अंध क्रिकेटपटू अतिशय उत्साहाने या स्पर्धेमध्ये भाग होतात घेतला.
सामनावीर पुण्याचा शब्बीर शेख ठरला. तर मॅन ऑफ टूर्नामेंट हा मान अकोल्याच्या प्रवीणने पटकावला. पारितोषिक वितरण समाजसेवक नानजी खीमजी ठक्कर यांच्या हस्ते झाले. सर्व खेळाडूंची राहाण्या खाण्याची सोय रोटरी क्लबने केली होती. अनेक नागरिकांनी या स्पर्धांना उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले आणि खेळाडूंचा उत्साह वाढवला.