कांदिवलीत ११० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

कल्याण निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणूकीचे अनुसरण करत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून रविवारी संत निरंकारी सत्संग भवन, कांदिवली (पश्चिम) येथे आयोजित रक्तदान शिबिरात ११० निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. संत निरंकारी रक्तपेढीने रक्त संकलनाचे कार्य पार पाडले.

रक्तदान शिबिरांची अविरत श्रृंखला जारी ठेवून परोपकाराचे कार्य करत आज निरंकारी मिशन देशातील सर्वोच्च रक्तदान करणाऱ्या संस्थांपैकी एक झालेले असून रक्तदानासह स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदु ऑपरेशन शिबिर यांसारख्या विविध सामाजिक कार्यांमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत.

या शिबिराचे उद्घाटन निरंकारी सेवादलाचे क्षेत्र क्र.५ चे क्षेत्रीय संचालक मुकुंद देवे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे स्थानिक प्रबंधक व सेवादल अधिकारी तसेच संत निरंकारी रक्तपेढीच्या वतीने मारुती कासारे आदि उपस्थित होते. संत निरंकारी मंडळाचे स्थानिक मुखी वसंत रणवरे यांच्या देखरेखीखाली स्थानिक सेवादल युनिट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांच्या सहकार्याने या शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.