आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा २३ वा सामना दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात २४ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर मागील सामन्यात गतविजेत्या इंग्लंडला मात देऊन दक्षिण आफ्रिकाचा संघ आत्मविश्वासाने भरलेले भरलेला असेल तर दुसरीकडे बांगलादेश सलग तीन पराभवांना सामोरे जाऊन चिंताग्रस्त असतील.
दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने
दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांनी २००२ ते २०२२ दरम्यान एकमेकांविरुद्ध २४ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यापैकी दक्षिण आफ्रिकेने १८ आणि बांगलादेशने सहा जिंकले आहेत. भारतात हे दोन्ही संघ कधीही एकमेकांविरुद्ध खेळले नाहीत. विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशने एकमेकांविरुद्ध समान यश मिळवले आहे.
दक्षिण आफ्रिका | बांगलादेश | |
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट) | ३ | ८ |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने (विजय) | १८ | ६ |
विश्वचषकात (विजय) | २ | २ |
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशची आतापर्यंतची कामगिरी
दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला पाचवा सामना खेळणार आहेत. या स्पर्धेत दोन्ही संघांचे प्रदर्शन विरोधाभासी आहे. दक्षिण आफ्रिकेने तीन विजय आणि एक पराभवाची नोंद केली आहे, तर बांगलादेशने एक विजय आणि तीन पराभव पत्करले आहेत.
सामना क्रमांक | दक्षिण आफ्रिका | बांगलादेश |
१ | श्रीलंकेचा १०२ धावांनी पराभव | अफगाणिस्तानचा ६ गडी राखून पराभव |
२ | ऑस्ट्रेलियाचा १३४ धावांनी पराभव | इंग्लंडकडून १३७ धावांनी पराभव |
३ | नेदर्लंड्सकडून ३८ धावांनी पराभव | न्यूझीलंडकडून ८ विकेटने पराभव |
४ | इंग्लंडचा २२९ धावांनी पराभव | भारताकडून ७ विकेटने पराभव |
संघ
दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को यानसन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रासी व्हॅन डर ड्युसेन, लिझाद विल्यम्स.
बांगलादेशः शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तन्झिद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो, तौहिद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराझ, नसुम अहमद, शाक मेहेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शोरीफुल इस्लाम, तनझिम हसन साकिब.
दुखापती अपडेट्स
बांगलादेशचा उजव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज तस्किन अहमद खांद्याच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. तो १९ ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध खेळलेल्या संघाचा भाग नव्हता. तसेच, बांगलादेशचा नियमित कर्णधार शकीब अल हसन क्वाड्रिसेपच्या दुखापतीमुळे भारताच्या सामन्याला मुकला होता. मात्र, तो दक्षिण आफ्रिकेच्या लढतीत परतणार आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी, त्यांचा कर्णधार टेंबा बावुमा, जो आजारपणामुळे २१ ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध खेळू शकला नाही, तो निवडीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. बावुमाच्या अनुपस्थितीत एडन मार्करामने इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले होते.
खेळण्याची परिस्थिती
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. या स्पर्धेतील दुसरा सामना हे ठिकाण आयोजित करेल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने येथे खेळला गेलेला शेवटचा सामना जिंकला. ४०० धावांचे लक्ष्य ठेवले गेले होते. पुढील सामन्यातसुद्धा भरपूर धावा होऊ शकतात. नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन विरोधी संघाला कडाक्याच्या उन्हात गोलंदाजीसाठी आमंत्रित करेल अशी अपेक्षा आहे.
हवामान
हवामान खूप उबदार राहण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. ५७% ढगांचे आच्छादन असेल. पावसाची शक्यता नाही. दक्षिण-आग्नेयेकडून वारे वाहतील.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
दक्षिण आफ्रिकेसाठी फलंदाजीची सुरुवात करणारा मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू क्विंटन डी कॉक आपल्या माजी घरच्या मैदानावर खेळण्याच्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. येथे खेळल्या गेलेल्या त्याच्या मागील सामन्यात मोठ्या धावसंख्येपासून वंचित राहिल्याने हा यष्टीरक्षक-फलंदाज एक मोठी पारी खेळायचा प्रयत्न करेल. त्याने चार सामन्यांमध्ये ५८ च्या सरासरीने आणि १०९ च्या स्ट्राईक रेटने २३३ धावा केल्या आहेत. चेंडूने कागिसो रबाडाची भूमिका महत्वाची असेल. या उजव्या हाताच्या मध्यम वेगवान गोलंदाजाने चार सामन्यांत आठ विकेट्स घेतल्या आहेत.
बांगलादेशसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांचा कर्णधार शकिब अल हसन परतणार आहे. त्याचा संघ आत्मविश्वासपूर्ण दक्षिण आफ्रिकेचा सामना करेल तेव्हा त्याचा अष्टपैलू म्हणून असलेला दीर्घ अनुभव उपयोगी पडेल. त्याने त्याच्या तीन सामन्यात ४० धावांचा सर्वोत्तम स्कोर केला आहे आणि ५ विकेट्स घेऊन आपल्या संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक म्हणून ठरला आहे. याशिवाय बांगलादेशच्या फलंदाजीची जबाबदारी मुशफिकुर रहीमकडे असेल. चार सामन्यांत ५२ च्या सरासरीने आणि ८४ च्या स्ट्राईक रेटने १५७ धावा करणारा तो त्याच्या संघासाठी सर्वात उत्कृष्ट फलंदाज आहे.

आकड्यांचा खेळ
- क्विंटन डी कॉक त्याचा १५० वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६५०० धावा पूर्ण करण्यापासून ९१ धावा दूर आहे
- मेहदी हसन मिराझ एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्यापासून ४ विकेट्स दूर आहे
- लिटन दासला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५०० धावा पूर्ण करण्यासाठी ९५ धावांची गरज आहे
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: २४ ऑक्टोबर २०२३
वेळ: दुपारी २:०० वाजता
स्थळ: वानखेडे स्टेडियम, मुंबई
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)