ठाणे: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांचे शुक्रवारी (ता. ४) रात्री हृदयविकाच्या झटक्याने निधन झाले. ते ५९ वर्षाचे होते. त्यांच्यावर शनिवारी वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी आणि दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.
प्रदीप इंदुलकर हे शुक्रवारी काही खासगी कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. मुंबईहून सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या वागळे इस्टेट येथील राहत्या घरी परत असताना त्यांच्या छातीत दुखू लागल्याने ते अचानक रस्त्यातच कोसळले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ठाण्यातील एका खासगी १२ वाजता इंदुलकर यांचे उपचारादरम्यान निधन झाले. प्रदीप इंदुलकर यांची ओळख ही एक सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी म्हणून होती. ठाण्यातील अनधिकृत बांधकामे, भ्रष्टाचार, वायू प्रदूषण, सार्वजनिक उत्सवांच्या काळात होणारे ध्वनी प्रदूषण याच्या विरोधात त्यांनी कायम आवाज उठला आहे.
सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी इंदुलकर यांनी जाग (जॉईंट अॅक्शन अँड अवेरनेस ग्रुप) या संस्थेची देखील स्थापना केली होती. जैतापूर येथे होणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी सुरू केलेल्या आंदोलनात इंदुलकर सहभागी होते. जैतापूर प्रकल्पाला विरोध का आहे हे जगभरातील लोकांना कळावे, म्हणून इंदुलकरांनी माहितीपट तयार केला होता.