गगनचुंबी इमारत परिसरात आगीमुळे धुराचे लोट

कल्याण : शहाड़ स्टेशननजीक असलेल्या बिर्ला वान्य या निर्माणाधीन इमारतीच्या परिसरात ठेवलेल्या थर्मोकोलला सोमवारी संध्याकाळी ६.१५ वा.सुमारास आग लागल्याची घटना घडली.

आग लागल्यची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. ही आग इमारतीसाठी आणलेल्या बांधकाम साहित्यातील थर्मोकोलला लागली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. आगीची तीव्रता कमी होती, व्हेंटिलेशन डकमुळे वरच्या बाजूस धुर पसरला असल्याने धुराचे लोट उसळले. नविनच बांधकाम असल्याने रिकामी इमारत होती, त्यामुळे जीवितहानी झाली नसल्याची महिती अग्निशमन दलाच्या पाथकाकडून देण्यात आली आहे.