ठाणे: कळवा रेल्वे स्थानकाजवळ सम्राट अशोक नगर येथील सेवालाल मंदिराजवळील एका चाळीवर एका महाकाय चिंचेच्या झाडाची भली मोठी फांदी कोसळून सहा घरांचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास घडली.
येथील चाळीच्या कडेला असलेल्या एका जुन्या व मोठ्या चिंचेच्या झाडाची मोठी फांदी तुटून भारत खडे, रुपेश राठोड, कुंदा गायकवाड, अमित रेड्डी, झुमलीबाई चव्हाण व लक्ष्मण पवार यांच्या घरावर कोसळून घरांचे पत्रे फुटून नुकसान झाले. घटनास्थळी पडलेली फांदी कापण्याचे काम ठाणे महापालिका वृक्षप्रधिकरण विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी केले. सुदैवाने कुणी जखमी झाले नाही.