गायक राहूल देशपांडेचा रोमॅटिक अंदाज

अमलताश चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

ठाणे : अतिशय हळवी नाजुक नात्यांची गोष्ट सांगणारा अमलताश चित्रपट  महाराष्ट्रात प्रदर्शित झाला  आहे, सुविख्यात शास्त्रीय संगीत गायक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते राहुल देशपांडे आणि अभिनेत्री पल्लवी परांजपे या दोघे मुख्य भुमिकेत पाहायला मिळणार आहेत गायक राहूल देशपांडे यांचा पहिल्यांदा रोमॅटीक अंदाज प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे, या चित्रपटात राहूल देशपांडे यांचा रोमॅटीक अदांजाबरोबर सुमधुर गाणी देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, हा संपुर्ण चित्रपट पुण्यामध्ये शुट झाला असून पुण्याची संस्कृती अनुभवता येणार आहे. तसेच अमलताश हे एक झाडाच नाव असून या झाडाच्या फुलांचा बहर एक महिनाभर असतो तशीच स्टोरी या चित्रपटाची असल्याने अमलताश अस नाव ठेवण्यात आलय, परदेशातून पुण्यात आलेल्या किर्तीची लव्हस्टोरी तसेच राहूल व किर्तीची अनेक गाणी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांनी अमलताश हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहावा असं आवाहन निखिल पोहेकर आणि  अभिनेत्री पल्लवी पराजंपे यांनी केलय.