सिंधुदुर्ग मतदानात अव्वल तर ठाणे जिल्हा पिछाडीवर

कोकण पदवीधर मतदारसंघात ६५ टक्के मतदान

ठाणे : प्रमुख उमेदवार असलेले महायुतीचे निरंजन डावखरे आणि महाआघाडीचे रमेश कीर यांच्यासह १३ उमेदवारांचे भवितव्य आज कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतपेटीत बंद झाले. मतदारसंघात एकूण ६५ टक्के मतदान झाले असून सर्वाधिक ८०टक्के मतदान सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर सर्वात कमी ५६टक्के मतदान ठाणे जिल्ह्यात झाले आहे.

यंदा मागील निवडणुकीपेक्षा जास्त मतदान झाले असून हे वाढलेले मतदान कोणत्या उमेदवाराला लाभदायी ठरणार हे १ जुलै रोजी मतदानाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. यंदा महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे तर महाआघाडीकडून काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात थेट लढत झाली. भाजपचे उमेदवार डावखरे यांना शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासह मनसेने देखील पाठिंबा दिला होता. त्यामुळे डावखरे हॅट-ट्रिक साधणार असे बोलले जात आहे.