शिवा म्हणजे शिवानी पाटील ! संघर्षनगर नावच्या वस्तीत राहणारी शिवा, वडिलांचं गॅरेज चालवते. शिवा अख्ख्या वस्तीला माहितेय, कारण तिचा बेधडक स्वभाव, अन्यायाला तोंड द्यायची तिची प्रवृत्ती आणि अडल्यानडल्याच्या मदतीला धावून जाणे. शिवाच्या घरी आहेत तिची मोठी बहीण दिव्या, तिची आई आणि तिची आज्जी ! वडिलांचं अकाली निधन झाल्याने या सगळ्यांची जबाबदारी शिवावर आहे, दिव्याचा स्वभाव शिवापेक्षा अतिशय वेगळाय, याच दिव्याचा फोटो बघून तिच्या प्रेमात पडतो तो आशु, आशुतोष देसाई ! कोट्याधीश आणि अतिशय संस्कारी कुटुंबातील मुलगा ! आशु आणि शिवाच स्वभाव एकदम विरुद्ध ! पण त्यांच्यात नकळत मैत्रीचं नात तयार होते, अश्या या बिनधास्त आणि बेधडक शिवाला ती जशी आहे तशी हा समाज स्वीकारू शकेल का ?
जगदंब क्रिएशन ने ह्या मालिकेची निर्मिती केली असून मालिकेचं पटकथा लेखन केलं आहे अभयसिह जाधव यांनी तर संवाद लेखक प्रह्लाद कुडतरकर हे आहेत. मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत स्वप्नील वारके. यात बिनधास्त शिवाची भूमिका साकारणार आहे पूर्वा कौशिक. तिच्या सोबत प्रमुख भूमिकेत असतील शाल्व किंजवडेकर, समीर पाटील, मीरा वेलणकर आणि सविता मालपेकर हे कलाकार.
तर प्रेक्षकांच मनोरंजन करायला सज्ज असलेली बिनधास्त जगणारी “शिवा” येतेय १२ फेब्रुवारीपासून रात्री ९ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.