ठाणे : ठाणे शहर सुशोभीकरण प्रकल्प महानगरपालिका हद्दीत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ठाणे शहर सुंदरीकरणाला सुरुवात झाली आहे.
या अंतर्गत शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थांच्या बाहेरील दर्शनीय भिंतीवर चित्रे व स्वच्छतेचे संदेश लिहून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे कलेचे काम एस.एम.सी. इन्फ्रास्ट्रक्चरने घेतले आहे. याच अंतर्गत स्केचो अॅक्टीवीटी सेंटरमधील प्रमुख मूर्तिकार, चित्रकार, आरती शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहा कलाकार टीमने ठाणे शहरात सुशोभीकरण कलेच्या आगळ्यावेगळ्या कल्पना राबविल्या आहेत.
या निमित्ताने ठाणे पूर्व आनंदनगर येथे हातात कुंचला घेत भिंत रंगवून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने शिवजयंती रंगसोहळा साजरा करण्यात आला. शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच ४०० चौरस फुटांचे वॉल पेंटींग आर्टिस्ट कला शिक्षक आरती शर्मा यांच्या समशेर शेख, सिध्दार्थ नागरे, पांडुरंग पाटील, अजित कदम, संभू दलाई या सहा जणांच्या टीमने प्रोटेट रंगात शिवशाही रेखाटली.