भिवंडी : भिवंडी तालुक्यातील शिवसेनेची सत्ता असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत कुरुंद उपसरपंच पदावर सेनेच्या भाई पाटील यांची आपसांत ठरल्याप्रमाणे बिनविरोध निवड करण्यात आली.
तालुक्यात महत्त्वाची समजली जाणारी कुरुंद ग्रुप ग्रामपंचायतीच्या मावळते उपसरपंच योगेश बंटी पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर पाटील यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली.सरपंच दिपाली दिलीप केदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक नितीन देशमुख यांनी काम पाहिले.या विशेष सभेत ग्रामपंचायत सरपंच दिपाली केदार,मावळते उपसरपंच योगेश बंटी पाटील,ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य जान्हवी जगदीश पाटील,निकीता मुकेश जाधव,रेश्मा गणेश वाघे,विशाखा विश्वनाथ भोईर सदस्यांनी सहभाग घेतला.यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख भरत शेलार,डाॅ.अभय पाटील,युवा नेता प्रशांत पाटील,साईनाथ पाटील,सचिन पाटील,मुकेश जाधव,जगदीश पाटील,गणेश वाघे, दिलीप केदार, ज्ञानेश्वर पाटील,गुरुनाथ पाटील,हनुमान पाटील,संजय पाटील,विनोद खंडु पाटील,विलास रामचंद्र पाटील,जगदीश बाळाराम पाटील,विश्वनाथ भोईर,प्रकाश पाटील,विश्वास पाटील, जितु ठाणगे,शाम पाटील,मोतीराम पाटील, सोनु ठाकरे,गणेश ठाकरे,वैभव पाटील,मधुकर मिरकुटे,केवल पठारे,दिलीप पाटील,बळीराम पाटील,संदिप विशे,उत्तम घागस,सोनु भोईर इत्यादींनी भेटून अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.नवनिर्वाचित उपसरपंच भाई पाटील यांनी संपुर्ण ग्रामस्थांचे आभार मानले असुन गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणार असुन गांवची पाणी समस्या सोडवण्याची आश्वासन यावेळी ग्रामस्थांना दिले आहे.