केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश
भिवंडी : तालुक्यातील महत्वाच्या डाहे ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह शिवसेनेच्या वरई व पिंपरोली गावातील शिवसेना शाखाप्रमुखांनी भाजपामध्ये नुकताच प्रवेश केला. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शिवसैनिकांचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजनांबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रगतीशील धोरणांमुळे भाजपामध्ये प्रवेश केला असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले.
डाहे गावाच्या सरपंच वृषाली सचिन पाचलकर, पिंपरोलीचे शिवसेना शाखाप्रमुख बाळाराम नामदेव मोरे, वरईचे शिवसेना शाखाप्रमुख रिशू नडगे, उपशाखाप्रमुख किरण बबन कुऱ्हाडे, शांताराम तान्हू मलावकर, मनोहर बारकू मलावकर, अल्पेश दशरथ मलावकर, ज्ञानेश्वर अंकुश मलावकर, नामदेव नारायण मलावकर, कैलास भिका बहारे यांनी भाजपाचा झेंडा खांद्यावर घेतला.
या वेळी भाजपाच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजु दळवी, तालुका सरचिटणीस राजेश रिकामे, शंकर भोईर, राजाराम विशे, पांडुरंग सोनावणे, विष्णू वेखंडे, सुनिल कालात, रमेश घाटाळ, युवा मोर्चाचे प्रमोद विशे, अतुल वेखंडे, शांताराम कोकाटे, कल्पेश पाटील, निलेश वरखंडे यांच्यासह वाडा पुर्व विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.