सिने अभिनेते संजय दत्त यांच्या हस्ते उद्घाटन
अंबरनाथ: हजारो अंबरनाथकर रसिकांच्या उपस्थितीत प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूरच्या सुमधुर गाण्यांच्या स्वरात, सिने अभिनेते संजय दत्त, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवलला उत्साहात सुरुवात झाली.
डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने यंदाही शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचे आयोजन शिवमंदिराच्या समोरील पटांगणात करण्यात आले आहे.
सिने अभिनेते संजय दत्त, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, युवा नेते पूर्वेश सरनाईक आदी यावेळी उपस्थित होते. मी मोठा शिवभक्त आहे, लहानपणापासून मी ऐकून होतो, पण मला यावर्षी येण्याचे भाग्य खा. शिंदे यांच्यामुळे मिळाले, अशा भावना संजय दत्त यांनी व्यक्त केल्या.
मेरे झोपडीमे राम आयेगे, मनी नाही भाव, देवा मला पाव, सजा दो घर को गुलशन सा, मेरे घर सरकार आये है, अवध मे राम आये है, घर घर मे एक ही नारा गुंजेगा, भारत का बच्चा जय श्रीराम बोलगा यासारख्या भजनाने मैथिली ठाकुरने श्रीरामाच्या जय घोषात कार्यक्रमाची सुरुवात केली. रसिकांनी ठेका धरला.
शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचे यंदा सातवे वर्ष आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, खासदार सी रमेश आदींच्या उपस्थितीत फेस्टिवलचे उदघाटन झाले.
महोत्सवाची रसिक वाट पाहात असतात त्याचे उदघाटन झाले, नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो, असे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. काशीच्या धर्तीवर शिवमंदिरचा विकास होणार अशी माहिती त्यांनी दिली. मंदिराची महती देशभरात पोहोचली आहे, विकास कामे करून शहरे पुढे नेण्याचे काम करत असल्याचे खासदार डॉ शिंदे म्हणाले. महोत्सवामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून आकर्षक नेत्रदीपक विद्युत रोषणाईने अंबरनाथ सह शिवमंदिर परिसर रोषणाई करण्यात आली आहे.
महोत्सव असलेल्या ठिकाणी दर्शनी भागात श्रीराम मंदिराची आकर्षक प्रतिकृती, कलादालनाची निर्मितीकडे रसिकांची पावले अकर्षली जात होती, आकर्षक स्टेज त्याला साजेशी विद्युत रोषणाई आणि मैथिलीच्या गाण्यांनी पहिल्याच दिवशी रसिक मंत्रमुग्ध झाले होते. उद्या 1 मार्च रोजी गायक अभिजित भट्टाचार्य, गायिका साधना सरगम, 2 मार्च रोजी कैलाश खेर आणि 3 मार्च रोजी सोनू निगम यांच्या गाणी ऐकण्याची रसिकांना संधी मिळणार आहे.