शहापूर तालुक्यात ‘बर्ड फ्लू’चा संकटानं डोकं वर काढलं

शहापुरात बर्ड फ्ल्यू

राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थानचा अहवाल

३०० कोंबड्या दगावल्या

१५ हजार कोंबड्यांवर येणार संक्रात

शहापूर तालुक्यात ‘बर्ड फ्लू’चा संकटानं डोकं वर काढलं आहे.वासिंद परिसरातील वेहलोळी येथे ३०० कोंबड्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली.या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.यापूर्वीही या भागातील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाली होती. घटनास्थळी सदर कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याचे काम पथकाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास महसूल प्रशासन , पशुसंवर्धन विभाग , पंचायत समिती विभाग यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित सुरू असून परिसरातील ६ पोल्ट्री व्यावसायिकांच्या पोल्ट्रीमधील पक्ष्यांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू आहे.विशेष म्हणजे हजारो पक्ष्यांची विल्हेवाट लावतांना संबंधित पोल्ट्री व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळावी याची मागणी त्यांनी केली असून शासन स्तरावरुन किती नुकसान भरपाई मिळते याकडे या पोल्ट्री व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. या परिसराव्यतिरिक्त इतर कुठेही अशी बाब निदर्शनास आली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

#प्रतिक्रिया#
या परिसरातील ३०० कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे.तर १ ते दिड किलोमीटरच्या आत अंदाजे १५ हजार पक्षी असण्याची शक्यता असुन तेवढे पक्षी नष्ट करण्याचे काम सुरू आहे-डॉ.दर्शन दळवी,पशुवैद्यकीय अधिकारी, शहापूर.