ठाणे : शहरातील कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून आज सात नवीन रुग्णांची भर पडली तर एकही जण कोरोनामुक्त झाला नाही. ठाणेकरांनी मास्कचा वापर करून काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
मागील एक ते दीड महिना नवीन दैनंदिन कोरोना रूग्ण एक किं वा दोन सापडत होते, परतु आज हा ं आकडा सातवर पोहोचला आहे. माजिवडे- मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सर्वात जास्त चार नवीन रूग्ण वाढले आहेत. वर्तकनगर, लोकमान्य-सावरकर नगर आणि वागळे प्रभाग समिती भागात प्रत्येकी एक रूग्ण नोंदवला गेला आहे. उर्वरित पाच प्रभाग समिती परिसरात मात्र एकही रूग्ण सापडला नाही. विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी एकही जण कोरोनामुक्त झाला नाही. आत्तापर्यंत एक लाख ८१,५५१ जणांनी कोरोनावर मात के ली आहे तर रुग्णालयात आणि घरी १७ जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २१२७जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ४०२ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये सातजण बाधित सापडले आहेत. आत्तापर्यंत २४ लाख ६९९८ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,६९५जण बाधित मिळाले आहेत.