मधमाशा घटल्या…परागीकरणही रोडावले
ठाणे : सध्या राज्यातील शेतशिवारात मधमाशांची संख्या घटली आहे. यामुळे परागीकरण होत नसल्याचे दिसत आहे. याचा परिणाम म्हणून कांदा आणि सूर्यफूलाचे बिजोत्पादन घटण्याची शक्यता आहे. या समस्येमुळं आता कांदा आणि सूर्यफूलाचे चांगल्या दर्जाचं बियाणं मिळणंही मुश्किल झाल्याची माहिती बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे.
शेतशिवारात मधमाशांची संख्या घटल्याने कांदा आणि सूर्यफूल बीजोत्पादन करणारे शेतकरी चिंतेत आहेत. मधमाशा अतिशय कमी झाल्यामे परागीकरण होत नाही. परिणामी कांदा आणि सूर्यफूल बीज उत्पादन घटण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. मधमाशांची संख्या घटल्याने फुलांमधून परागीकरण पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे कांदा आणि सुर्यफुलाचे बिजोत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दिवसेंदिवस नेहमी शेतशिवरात दिसणारे मधमाशांची पोळे आता कुठे दिसत नाहीत. त्यामुळे आता बियाणे उत्पादक शेतकरी चांगलेच चिंतेत सापडले आहेत. कारण मधमाशा फुलांकडे आकर्षित होऊन फुलांवर बसतात आणि त्यामुळे परागीकरण होऊन फुलांमध्ये चांगल्या उत्पादक क्षमतेचे बीज तयार होते. पण मधमाशा कमी झाल्याने आणि परागीकरण कमी झाल्याने जे बीज तयार होते त्याची उगवण क्षमता कमी असते. तर काही वेळेला ते बीज उगवत नाही. त्यामुळे आता चांगल्या उगवण क्षमतेचे बीज तयार होत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
शेतात किटकनाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी
सध्या शेतकरी शेतात अनावश्यक किटकनाशकांची फवारणी करत आहेत. तसेच अनेक विषारी औषधांची फवारणी जसे तणनाशके शेतातील पिकांवर करत असल्याने मधमाशा मृत्यू पावतात. तसेच वातावरणातील प्रदूषणामुळे, रासायनिक औषधांच्या वासाने मधमाशा फुलांकडे येत नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांनी अशा अनावश्यक किटकनाशक औषधांची फवारणीही टाळावी. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मधमाशांसाठी पोषक वातावरण तयार करावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
मधमाशा शेतशिवारात वाढल्या तर परागीकरण मोठ्या प्रमाणात होऊन चांगल्या आणि उच्च प्रतीचे बिजोत्पादन होईल. यावर्षी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असली तरी मधमाशा दिसत नाहीत. याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होताना दिसत आहे.