मिशन इंद्रधनुष्य मोहिमेची ४ एप्रिलपासून दुसरी फेरी

ठाणे : मिशन इंद्रधनुष्य ४.० मोहिमेच्या अंतर्गत जिल्ह्यातील वीटभट्टी, झोपडपट्टी भाग, औद्योगिक व इमारत बांधकाम कार्यक्षेत्रातील लसीकरणापासून वंचित लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेची दुसरी फेरी ४ एप्रिलपासून सुरू होणार असून १० एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.

मिशन इंद्रधनुष्य 4.0 व्दितीय फेरीमध्ये मुरबाड, कल्याण व भिवंडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच अंबरनाथ व बदलापुर नगरपालीका काषेत्रात एकुण 49 लसीकरण सत्रांचे आयोजन केले असुन या सत्रांमध्ये लसीकरणापासुन वंचित राहिलेले 0 ते 2 योगटातील 418 बालके व लसीकरणापासुन वंचित 72 गरोदर माताचं े लसीकरण करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हामाता-बाल संगोपन अधिकारी डॉ.अंजली चौधरी यांनी दिली.

ह ी म ो ह ि म य श स् वी करण्याकरीता जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार तसेच आरोग्य व बांधकाम समिती सभापती वंदना भांडे यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेणेबाबत आवाहन केले आह.