रंगवल्लीच्या रांगोळ्यांतून अवतरले शास्त्रज्ञ

ठाणे: ‘रंगवल्ली परिवार’, ठाणे तर्फे यंदाच्या दिवाळीमध्ये भारतीय वैज्ञानिक व शास्त्रज्ञ हा विषय घेऊन भव्य व्यक्तिचित्र-रांगोळी तसेच वैज्ञानिकांची नावे सुलेखन रांगोळीत आलेखून प्रदर्शन आयोजित केले होते.

ठामपा शाळा नं. १९ येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. अतिप्राचीन काळापासून ते आत्ताच्या भारतीय वैज्ञानिकांना रांगोळीच्या माध्यमातून एक मानवंदना देण्यासाठी, तसेच रसिकजनांपर्यंत शास्त्रज्ञांची माहिती व कलेची प्रसिद्धी व्हावी या हेतूने रंगवल्ली परिवाराने ह्या प्रदर्शनाचे आयोजन केले.

प्रदर्शनाचे संयोजन, संकल्पना ही संपूर्णपणे रंगवल्ली परिवारचे अध्यक्ष वेद कट्टी ह्यांची आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून दा. कृ. सोमण, अनिल काकोडकर लाभले होते.