आपला मनुष्य जन्म सफल, यशस्वी व्हावा म्हणून आपले अध्यात्म सतत अनेक प्रकरानी सांगत असते. आपल्या अमूल्य मानवी जीवनाचे हेच मोठे धेय्य असायला हवे. कारण ८४ लक्ष योनी पार केल्यानंतर मिळालेल्या मनुष्य जन्माची ही सार्थकता आहे. हे माणूसच केवळ करू शकतो कारण नियतीने त्यास बुद्धीची मोठी देणगी दिलेली असून त्या देणगीचा मनुष्याने उत्तम उपयोग करावा ही नियतीची अपेक्षा असते. समाजात आतापर्यंत बरीच संत मंडळी येऊन गेली. गोंधळलेल्या ,दिशाहीन , निष्प्रभ जनतेला योग्य रस्ता दाखवून ह्या नश्वर जगातून चालती देखील झाली. आपल्या संस्कृतीत जीवनाच्या प्रारंभापासून ते थेट शेवटपर्यंत आचरणाच्या चार महत्वाच्या पायर्या सांगितल्या आहेत. त्या म्हणजे प्रसिद्ध चार आश्रम होत. प्रत्येक आश्रमरुपी पायरी यशस्वी पार करूनच पुढे जायचे आहे .१. ब्रह्मचर्याश्रम २. गृहस्थाश्रम ३. वानप्रस्थाश्रम आणि ४. संन्यासाश्रम. आपल्या पूर्वजांनी या प्रत्येक पायरीमध्ये प्रत्येकास काही कर्तव्य व जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. त्यांचा विचार केला म्हणजे यशस्वी जीवनाला त्या किती पोषक आहेत हे लक्षात येते.
१] सर्वात प्रथम पायरी म्हणजे ज्ञान प्राप्तीची आहे. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तिचे यथार्थ ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे आपण केलेल्या कामात अधिक यश मिळते असे जाणवते. त्यामुळे ते समजून काम करण्यासाठी व आवश्यक ज्ञानप्राप्तीसाठी जीवनातील सर्वात प्रथम पायरी ज्ञानप्राप्ती आहे. एखादी गोष्ट आत्मसात करायची असल्यास ती बालवयातच केली जाते. कारण बालवयात मन व इंद्रिये अधिक तरतरीत, ताजीतवानी व आकलनशील असतात, साहजिकच ज्ञानप्राप्ती बालवयातच सक्षमतेने अधिक होऊ शकते. पूर्वी ज्ञान प्राप्तीसाठी गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेण्याची पद्धत होती. ते घेताना गुरुकडेच राहून त्यांचे पडेल ते काम करून विविध प्रकारचे ज्ञान [वेदादी सुक्ते, मंत्र, तंत्र कला, तत्कालीन पद्धती] शिकावे लागे. गुरूगृही पडेल ते काम करावे लागल्याने ज्ञानप्राप्तीची किंमत विद्यार्थ्यांना पुरेपूर समजून होती, पण दुर्दैवाने हल्ली ती पद्धत नसल्याने मुलांना ज्ञानप्राप्तीसाठी काहीच स्वतःचे असे करावे लागत नसल्याने त्यामागील तळमळ दिसत नाही. परिणामी आवश्यक तेवढी ज्ञानप्राप्ती देखील होताना दिसत नाही. ज्ञानप्राप्तीनंतरची दुसरी पायरी म्हणजे गृहस्थाश्रमाची.
२] गृहस्थाश्रम करण्यासाठी आधी मिळवलेल्या ज्ञानाचा शास्त्राचा मंत्रतंत्राचा उपयोग करूनच पुढे जायचे असते. अत्यंत प्रामाणिकपणे, नेटाने, विश्वासाने, भक्तीने परिश्रम करून प्रपंचाचा रथ ओढीत असताना त्यात येणाऱ्या कटकटी, विरह, अपयश, दुःखे इ.ना धैर्याने व समर्थपणे तोंड देऊनच परमार्थाचा देखील विचार करायचा असतो. त्यासाठी लागणारा विवेक, सदाचरण, प्रेम, सहकार, परोपकारच उपयोगी पडतो. संसारात इतरांना दुःखी, असमाधानी ठेऊन माणसाला कधीही मोक्ष व खरे सुख मिळणारा नसतो ’प्रपंच करावा नेटका, मग ध्यावे परमार्थ विवेका’ ही समर्थ रामदास स्वामींची उक्ती समाजाला बरेच काही सांगून जाते. पण प्रत्यक्षात माणूस प्रपंच व मोक्षाची गल्लत करतो व फसतो. नेटका केलेला प्रपंच ही मोक्षाची पायरी असते. विठ्ठलपंतानी त्यांच्या गुरूंच्या आज्ञेनुसार परत संसारात प्रवेश केल्यानंतर निवृत्ति, ज्ञानदेवादी गुणवान रत्ने जन्मास आली. ही केवढी मोठी इतिहासाची साक्ष आपल्याला सापडते. आपल्या मुलांना चांगले सुसंस्कारित व गुणवान बनवल्यावर त्यांना त्यांच्या कर्तव्याची जबाबदारी जाणीव दाखवून हळूहळू गृहस्थाश्रमातून स्वतःचे अंग काढून वागणे हेच योग्य होय [उदा. कासवाचे देता येईल].
३] वानप्रस्थाश्रम – माणूस वृद्ध झाला तरी त्याचे संसारातून लक्ष निघत नाही, परिणामी घरात अशांतता, भांडणे, हेवेदावे, धुसफूस ठरलेलीच. हल्लीच्या दयनीय वृद्धांच्या अवस्थेस तेच कारणीभूत असतात. घराघरातून वादावादी सर्वत्र वाढतच राहते. अर्थात हल्ली वृद्धाची वाईट अवस्था होते त्याला हे देखील महत्त्वाचे कारण आहे. घरात वृद्धांनी अजिबात लुडबुड न करता गरजेनुसारच तरुणांना सल्ला वा सूचना द्याव्यात. खरोखरीच संसारातून लक्ष हळूहळू काढून घेऊन व उर्वरित जीवनकाल शांतपणे कंठणे.
४] संन्यासाश्रम – सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे संन्यस्त वृत्ती. प्रत्येक बाबतीत संन्यस्त यादृष्टीने पाहायला हवे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कमल पत्राचे देता येईल. कमळ पाण्यात रहात असूनही पाण्याचा थेंब देखील त्यावर चिकटत नाही. पूर्वी राजे मंडळी त्यांच्या उतारवयात सर्व राजभोग सोडून वनात जाऊन रहात व ईश्वर चिंतनात वेळ घालवणे पसंत करीत असत. वास्तविक पाहता हेच स्वर्गसुख म्हणता येईल.

मोक्ष म्हणजे आणखीन वेगळे काही नाही. पण त्यादृष्टीने आपण पाहायला हवे. आपली संतमंडळीसुद्धा त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्या त्या प्रत्येक पायरीतून गेलेली आहेत. [अपवाद वगळता] पण काही जणांचे इथले वास्तव्यच कमी होते. उदाहरणार्थ समर्थ रामदासांनी मधल्या दोन्ही पायऱ्या एकदम पार केलेल्या दिसतात. सर्व थोर मंडळींना त्यांच्या शक्तीने सर्व समाजाला एकच सांगणे असे की प्रत्येकाने आपल्याला नियतीने नेमून दिलेले काम करत रहाणे व ते करीत असतानाच त्यापासून मिळणाऱ्या कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवू नका. कारण फक्त कर्म करण्याचाच अधिकार आपला आहे, [भग.गीतेत भगवंताने अर्जुनास हेच सांगितले आहे.] संतांची हा मंत्र सांगण्याची पद्धत वेगळी असली तरी त्यामागील मतितार्थ एकच होता. श्रीकृष्णाने अर्जुनास हाच मंत्र दिला. कर्माचे भलेबुरे फळ हे त्याच्या त्याच्या प्रारब्धवर अवलंबून असते. यशस्वी जीवनात जीवनाचे तेच महान गुपित आहे. प्रत्यक्ष केलेले कर्म व मिळणारे फळ ह्या दोन बाबी पूर्णपणे वेगळ्या आहेत.
सुख व दुःख ह्या एकमेकांशी चांगलेच निगडीत असून ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे हा पाठशिवणीचा खेळ जीवनात सतत चालूच राहणार आहे. ही आपल्या संतांची शिकवण आहे. चालू जन्मी कसे वागावे, आचरण ठेवावे हे पूर्णपणे आपल्या हाती आहे. त्यासाठी मात्र सद्गुरुचे मार्गदर्शन हवे. मोठ्या मोठ्या संत महात्म्यांना गुरुची कृपा होती पण त्यांना देखील प्रारबद्ध सुटले नाही. मग आपल्यासारख्या सामान्यांची काय कथा ? कोणाही गुरूने महात्म्याने कर्माचा त्याग करायला कधीच सांगितलेला नाही कारण जीव जोपर्यंत कर्म करायचेच आहे, त्यापासून कुणाचीच सुटका नसते. आपण अगदी स्वस्थ बसलो तरी श्वास घेणे व सोडणे चालू असतेच. जास्त कशाला, देवाला वास्तविक काहीच वेगळे असे प्राप्त करायचे नसते, तरीही त्याचे काम चालूच असते ना त्यामुळे कर्म कधीच थांबू शकत नाही.
आपण इतकेच करायचे आहे की आपल्या वाट्याला आलेले कर्म प्रेमाने, समर्पित बुद्धीने, ईश्वर साक्ष ठेऊन करायला हवे. त्यात देव पहिला की आपल्याला आनंद होऊन दुखाचा विसर पडू लागतो. आपल्या हातून उत्तम देवकार्ये होतात. तीच आपल्या जीवनाची इति कर्तव्यता होय. पाश्चिमात्य संस्कृती भोग प्रधान तर आपली पौर्वात्य संस्कृती त्याग प्रधान आहे. त्यागी संस्कृतीतील मिळणारे सुख शास्वत प्रदीर्घ असणारे आहे, त्यामुळे पाश्चिमात्त्य राष्ट्रांनी कितीही वैज्ञानिक प्रगती साधली तरी मानसिक शांतीसाठी त्यांना ही दीर्घकालीन सुख प्राप्त होण्यासाठी मनःशांतीची कास धरावी करावी लागते. हे नक्की.रामकृष्ण विनायक अभ्यंकर
२/४६ भक्तियोग सोसायटी,

परांजपे नगर, वझिरा नाका
बोरीवली प. मुंबई ४०००९१
बोरीवली प. मुंबई ४०००९१
मोबा. ९८१९८४४७१०