रोटरी-वन खाते मिळून उभारणार मियावाकी जंगले !

ठाणे : वनीकरण करुन पर्यावरणाचा समतोल सांभाळण्याची चर्चा सुरु असताना वन खात्याच्या सौजन्याने नवी मुंबईतील रोटरी क्लब ऑफ सॅटेलाईट सिटी यांनी दोन एकरांवर बारा हजार झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

पडघाजवळील वन जमिनीची या अभिनव प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. जपानच्या मियावाकी वनप्रकारांतर्गत रोटरी क्लबतर्फे 5 जून रोजी या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे.

सर्वसाधारणपणे दोन एकरांत दोन-तीन हजार झाडे लावली जातात. परंतु मियावाकी प्रकारात याच क्षेत्रफळात सुमारे 12 हजार झाडे लावली जातील. यामुळे गडद वनराईच्या रुपाने निसर्ग परिसंस्थेची निर्मिती होणार आहे. अशा मानवनिर्मित जंगलात पशू-पक्षी येऊ लागतात, असे सांगण्यात आले. अशा उपक्रमात लावलेली झाडे दहा पट वेगाने काढून त्यांची घनता 30 पट असते. रोटरीचे प्रांतपाल डॉ. मयुरेश वारके यांच्या रस्ते या उपक्रमाचा आरंभ होईल.