रोबोटिक नी रिप्लेसमेंट सांधेदुखीवर उत्तम उपचार

ज्याप्रमाणे हजारो किलोमीटर्स चालवल्यावर गाडीच्या टायर्सची झीज होते त्याप्रमाणे वयोमानाप्रमाणे माणसाच्या अवयवांची झीज होते. उदा. डोळ्यात मोतीबिंदू होतो. केस पांढरे होतात. त्वचेवर सुरकुत्या पडतात. त्याचप्रमाणे गुडघ्याचे सांधे देखील झिजतात. आणि knee replacement शब्द कानावर पडतो. मनात भीती आणि अनेक शंकाकुशंका निर्माण होतात. यासाठी knee – replacement म्हणजे काय ते समजून घेऊया.
आपल्या गुडघ्याला दोन महत्त्वाची हाडे असतात. एक मांडीचे व दुसरे पिंडरीचे हाड. या हाडांचे घर्षण होऊ नये म्हणून निसर्गाने त्यांच्यामधे मऊ कुशल म्हणजेच कार्टिलेज दिलेले असते. याला कूर्चा म्हणता हे संरक्षक कार्टिलेज शॉक अब्जॉर्बरचे काम करते. पण वयोमानाप्रमाणे त्याची झीज होऊन ते पातळ होते. अशा वेळी मार लागल्याने अथवा दुखापतीने फाटते. मग हाडावर हाड घासले जाते. या सततच्या घर्षणाने सांधा आखडतो व दुखू लागतो. वेदना होऊ लागतात. यालाच आर्थायटिस असे म्हणतात.
अशी लक्षणे दिसल्यावर तातडीने ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक असते. लवकरात लवकर, योग्य वेळी औषधोपचार सुरु केल्याने शस्त्रक्रिया निश्चितपणे टाळता येते.
X. Ray काढल्यानंतर आर्थायटिसचे निदान होते. यात अर्ली स्टेज व अँडव्हान्स स्टेज अशा दोन स्टेजेस असतात. अर्ली स्टेजमध्ये विविध औषधोपचार व व्यायामाने झीज रोखता येते. P. R. P. / स्पेशल जेल इंजक्शंन्सने झीज आवाक्यात ठेवता येते.
परंतु आर्थ्रोयटिस अँडव्हान्स स्टेजमध्ये गेल्यास त्याच शस्त्रक्रिया आवश्यक ठरते. आज ही शस्त्रक्रिया आता अत्यंत सुलभ झाली आहे. त्यात पूर्वीपेक्षा अनेक सुधारणा झाल्या आहेत. ज्याप्रमाणे डेंटिस्ट दाताला कॅप बसवतात त्याप्रमाणे गुडघ्याच्या वरच्या आणि खालच्या हाडाला कॅप बसवून दोन हाडांच्या मध्ये कुशन टाकले जाते. व सांधा सुस्थितीत आणला जातो. सकाळी ऑपरेशन झाल्यावर पेशंटला संध्याकाळी चालता येते. पूर्ण रिकव्हरीला एक महिना लागतो. नंतर चालण्या फिरण्यावर काहीही बंधने अथवा मर्यादा राहत नाहीत, अनेकांना मांडीदेखील घालता येते. रोबोटिक नी रिप्लेसमेंटने शस्त्रक्रिया 100% यशस्वी होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेक लोक त्याचा फायदा घेत आहेत.

डॉ. उमेश पाटील
वृंदावन ऑर्थोपेडिक क्लिनिक
वृंदावन सोसा. बसस्टॉपजवळ ठाणे पश्चिम Mob: 8379868389