ठाणे : मध्य रेल्वेने आगामी सणासुदीच्या काळात प्रचंड गर्दी लक्षात घेऊन, निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत.
प्लॅटफॉर्मवरील गदीर्चे व्यवस्थापन करणे आणि स्टेशन परिसरात प्रवाशांची हालचाल सुरळीतपणे सुनिश्चित करणे हे याचे उद्दिष्ट आहे. दिवाळी सण आणि छठ पूजेदरम्यान प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे निर्बंध ८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत लागू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूरला निर्बंध आहेत.
ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्यांना प्रवास सुलभ व्हावा यासाठी या निबंर्धांमधून सूट देण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात सुरळीत आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे, अशी विनंती करत येत आहे.