रहिवाशांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट
डोंबिवली : नांदिवली टेकडी परिसरातील बालाजी गार्डनमधील रहिवाशांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. त्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका येथील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची रहिवाशांनी भेट घेत निवेदन दिले.
सुमारे एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या सोसायटीमध्ये आहे. त्यांच्याकडे अधिकृत लाइन असून देखील त्या लाइनला पाणीपुरवठा होत नाही. तसेच काहींनी अनधिकृत नळजोडणी केल्यामुळे या परिसराला पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचे अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी सांगितले. या अनधिकृत जोडणी पोलीस बंदोबस्तात उद्या मंगळवारी तोडण्यात येतील असेही त्त्यांनी सांगितले. येत्या दोन दिवसात बालाजी गार्डनमधील रहिवाश्यांचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असेही आश्वासन श्री. कुलकर्णी यांनी दिले.
यावेळी माजी नगरसेवक पंढरीशेठ पाटील, उद्योगपती-समाजसेवक वर्गिस म्हात्रे, रवी तागडकर, अजित सोलकर, सुनील सावंत, अमोल कोळी, प्रमोद सिंग, श्री. गरुड, तुषार शेठ उपस्थित होते.