दातांचा पिवळेपणा कमी करण्याआधी तो कशामुळे झाला आहे, हे कळणे गरजेचे आहे.
दात पिवळे होण्याची कारणे :
अ) दातांवर टार्टरचा थर जमा होणे.
ब) दातांची यावेळी झीज होणे.
क) नैसर्गिकपणे दात पिवळे असणे.
अ) दातांवर टार्टरचा थर जमा होणे.
* ज्यावेळी दात स्वच्छ करणे (Brushing) चुकीच्या पद्धतीत होत असते, त्यावेळी टार्टरचा पिवळा थर दातांवर जमा होतो.
* ज्या रुग्णांच्या लाळेमध्ये (Saliva) विशिष्ठ घटक असतात त्यांच्यात देखील टार्टर जमा होण्याचे प्रमाण अधिक असते.
उपाय :
१) योग्य पद्धतीने ब्रशिंग करणे. ब्रश स्ट्रोक आडवे न करता उभे आणि वर्तुळाकार फिरवणे.
२) रात्री झोपताना ब्रश करणे.
३) एका विशीष्ठ प्रमाणात टार्टर जमा झाल्यावर ते ब्रश किंवा घरगुती उपायाने स्वच्छ होत नाही. त्यावेळेत दातांच्या दवाखान्यात येऊन स्केलिंग ही प्रक्रिया केली जाते. त्याने दात स्वच्छ होतात आणि पिवळा थर निघून जातो. स्केलिंग केल्यानंतर पुन्हा योग्य पद्धतीत ब्रशिंग केल्याने दातांवर टार्टर जमा होत नाहीत.
४) स्केलिंग विना वेदना देणारी प्रक्रिया आहे. यात अल्ट्रासॉनिक व्हायब्रेशन रीप वापरून टार्टरचा थर काढला जातो.
ब) दातांची अवेळी झीज होणे.
उपाय :
१) ब्रशिंगचा दाब (Pressure & Force) हा कमी करणे.
२) मऊ (Soft & Ultrasoft) ब्रशचा वापर करणे.
३) झीज झालेल्या दातांवर कॉस्मेटिक आवरण लावून घेणे.
क) नैसर्गिक दात पिवळे असणे.
* नैसर्गिकपणे ज्यांच्या त्वचेचा रंग गोरा (Light Skin Tone) अशा व्यक्तींमध्ये पिवळेपणा जास्त उठून दिसतो. अशावेळी दातांवर कॉस्मॅटिक लॅमिनेट लावून दातांचा रंग Bright केला जातो.
* ब्लिचिंग (Bleaching) ही प्रक्रिया करून देखील १ – २ शेड पिवळेपणा कमी करता येतो.
– डॉ. वीणा भगत (गायकवाड)
(B.D.S.) (M.U.H.S.)
परफेक्ट स्माईल डेंटल क्लिनिक,
शिवाईनगर ठाणे (प)