कडोंमपा २७ गांव प्रश्न निकाली
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत समाविष्ट झालेल्या त्या २७ गावांतील रहिवाशांना पालिकेचा मालमत्ता कर भरताना दमछाक होत होती. ग्रामपंचायतीपेक्षा कितीतरी पटीने हा कर त्यांच्या डोक्यावर लादण्यात आला होता. पालिकेच्या या बेहिशोबी कराविरोधात अनेक वर्षे २७ गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण समिती लढत होती.
हा विषय समितीने खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे लावून धरला होता. अखेर या विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या बैठकीनुसार पालिकेने दहा पटीने अधिक वाढीचा मालमत्ता कर कमी करण्याबाबतचा जीआर काढला आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश आले असून समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे माध्यमातून सह्याद्री बंगल्यावर शुक्रवारी मुख्यमंत्री समवेत संघर्ष समितीच्या झालेल्या बैठकीद्वारे २७ गावांतील अनेक विषय मार्गी लागल्याचे समोर येत आहे.