माझ्या वयाची भूमिका साकारतोय – स्वप्नील जोशी

तू तेव्हा तशी म्हणत स्वप्नील जोशी बऱ्याच वर्षांनंतर मालिकेत एका मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेची पहिली झलक पाहूनच प्रेक्षक आतुर झाले आहेत. स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर हि जोडी बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून स्वप्नील यात सौरभ तर शिल्पा अनामिका दीक्षितची भूमिका साकारणार आहे. तू तेव्हा तशी हि गोष्ट आहे अव्यक्त प्रेमाची जी २० मार्चपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हि मालिका आणि त्यातील भूमिकेबद्दल बोलताना स्वप्नील म्हणाला, “मी या मालिकेसाठी खूप उत्सुक आहे. जळपास ७-८ वर्षांनंतर मेनस्ट्रीम टेलिव्हिजन करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी या मालिकेत माझ्या वयाची भूमिका साकारतोय. मी ४४ वर्षांचा आहे आणि या वयोगटातली हि प्रेमकथा आहे. खूप वेगळी आणि आजची गोष्ट आहे जी प्रेक्षकांनी आजवर पाहिली नाही आहे. मी आणि शिल्पा बऱ्याच वर्षांनंतर एकत्र काम करतोय तसेच आम्ही मंदारसोबत देखील पहिल्यांदाच काम करतोय त्यामुळे हि मालिका त्यातील व्यक्तिरेखा हे सगळंच खूप फ्रेश आहे. एकमेकांसोबत काम करत अनेक नवीन गोष्टी शिकत या  शूटिंगच्या प्रोसेसची मजा आम्ही घेतोय.” आपल्या नवीन मालिकेबद्दल उत्सुकता व्यक्त करताना स्वप्नील म्हणाला, “या नवीन वर्षाचं माझं रेझोल्यूशन होतं कि मला मालिका करायची आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो कि हि मालिका माझ्या वाट्याला आली. या मालिकेचं कथानक खूप रिफ्रेशिंग आहे, तसेच संपूर्ण टीम हि खूप कमाल आहे त्यामुळे मला आनंद आहे कि मी या मालिकेचा एक हिस्सा आहे.”