मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली नियुक्ती
ठाणे : विधान परिषदेतील आमदार रवींद्र फाटक आणि शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांची शिवसेनेच्या उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही नियुक्ती केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानतंरही आमदार रवींद्र फाटक आणि प्रकाश पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या गटातच होते. मात्र ठाकरे गटाकडून संशय व्यक्त होऊ लागल्याने या दोन्ही नेत्यांनी नाराजी व्यक्त करत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. काल गुरुवारी श्री.शिंदे यांनी त्यांच्यावर उप नेते पदाची जबाबदारी दिली. या दोन्ही नेत्यांच्या संघटन कौशल्याचा पक्ष वाढीसाठी नक्कीच आगामी काळात राज्यभर उपयोग होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. प्रकाश पाटील यांनी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ माजी अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य यासारखी पदे त्यांनी भुषविली आहेत. गोपीनाथ पाटील पारसिक बॅंकेच्या संचालक मंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत.
शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांचे खद्दे समर्थक असणारे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे हे शिंदे गटात गेल्यापासून पाटील यांच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. त्यांचे समर्थकही त्यांच्या निर्णयाबाबत उत्सुक होते.