अंबरनाथ-बदलापूरमध्ये शीघ्र प्रतिसाद टीम सज्ज

अंबरनाथ : नवीन वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देताना सावधगिरी आणि कोव्हिडच्या संकट ओढवू नये म्हणून सामाजिक अंतराचे भान ठेवावे, मद्यपान करून वाहन चालवू नये असे आवाहन अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

कोव्हिड 19 नंतर यंदा प्रथमच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक उत्साही आहेत. त्यांच्या आनंदावर कोणतीही आपत्ती उदभवू नये यासाठी दोन्ही शहरात सुसज्ज अग्निशमन दलाची शीघ्र प्रतिसाद टीम तैनात करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दल प्रमुख भागवत यांनी दिली. तयार करण्यात आलेली टीम अंबरनाथच्या हुतात्मा चौकात सज्ज ठेवण्यात आली आहे.

31 डिसेंम्बर साजरा करताना कोव्हिडचे संकट घोंगावू लागले आहे. त्यादृष्टीने सामाजिक अंतराचे भान ठेवावे, मास्कचा वापर करावा, आगीसारख्या घटना टाळण्यासाठी फटाक्यांची आतिषबाजी टाळावी, असे आवाहन अंबरनाथचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके आणि बदलापूरचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी केल्याची माहिती श्री. सोनोने यांनी दिली. आपत्ती सारख्या घटना घडल्यास 8308807576 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करणयात आले आहे.