राजेंद्र साप्ते परभणी जिल्हा संपर्क प्रमुखपदी

ठाणे : ठाण्याचे माजी उपमहापौर, विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र साप्ते यांची शिवसेना परभणी जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

राजेंद्र साप्ते हे ज्येष्ठ आणि कट्टर शिवसैनिक असून ठाणे शहराचे उप महापौर पद त्यांनी भूषविले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांचे निष्ठावंत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत त्यांचे योगदान आणि पक्षाशी असलेल्या निष्ठेची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांची परभणी जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

त्यांच्या नियुक्तीबद्दल ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.