भोंगे हटवा; समान नागरी कायदा आणा

ठाण्यात राज ठाकरे यांचा विरोधकांवर हल्लाबोल

ठाणे : येत्या ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवा अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालीसा लागणारच असा इशारा राज्य सरकारला देत देशात समान नागरी कायदा आणि लोकसंख्येवर नियंत्रण आणणारा कायदा आणा, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

गुढीपाडव्यानंतर विरोधकांनी के लेय टिके ला उत्तर देण्यासाठी मनसेने ठाण्यात उत्तर सभेचे आयोजन के ले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी विरोधकांच्या टिके ला उत्तर देत हिंदत्ु वाचा नारा पुन्हा एकदा दिला. गुढी पाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी जे तारे तोडले त्यांना उत्तर म्हणून ही सभा आहे, असे राज ठाकरे म्हणाले. माझ्या ताफ्याला काही जण अडवणार आहेत हे गुप्तचर विभागाला समजले, पण पवारांच्या घरावर एसटी कर्मचारी आं दोलन करणार आहेत हे समजले नाही, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला आहे. वीज भारनियमनाचे कारण सांगून अनेक ठिकाणी सभेचे प्रक्षेपण झाले नाही. यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करायची असा प्रश्न उपस्थित करत आजची ही सभा मोठे स्क्रीन लावून अनेक राज्यांमध्ये दाखवली जात असल्याचे श्री.ठाकरे म्हणाले. एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरावर धाड पडते. सुप्रिया सुळेंच्या घरात का पडत नाही, याचं उत्तर शरद पवार यांनी द्यावं. ज्या ज्या वेळेला शरद पवार नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले त्यानंतर नव्या नेत्यावर धाडी पडल्या. संजय राऊतांवर पवार खुश आहेत त्यामुळे पुढचं समजून जा अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी नेत्यांवर घणाघात के ला. मनसे संपलेला पक्ष नाही. इथे येऊन बघा, मनसे विझलेला पक्ष नसून समोरच्याला विझवणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस निवडून येणाऱ्या आमदारांची बांधलेली मोळी आहे. त्याची रस्सी शरद पवारांच्या हाती आहे. ही माणसं दसऱ्ु या कु ठल्याही पक्षात गेले तरी निवडून येतील असंही राज ठाकरे यांनी सांगितले.

मला ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला अशी टीका झाली. मी भूमिका बदलली नाही. मला ट्रॅक बदलायची गरज नाही. एका वर्षाच्या आत मी कोहिनूरमधून बाहेर पडलो. त्या कं पनीचा तपास सुरू झाला तेव्हा मला नोटीस आली आणि ईडीच्या कार्यालयात गेलो. ईडीच्या नोटिशीची चाहूल लागली तेव्हा शरद पवारांनी केवढं नाटकं के लीत. ज्यांनी पापच के ले नाही मग ईडी नोटीस येवो किं वा अन्य काही, मी भीक घालत नाही. ज्या गोष्टी मला नाही पटल्या ते जाहीरपणे बोललो. कलम ३७० रद्द के ले त्यावर अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी व्हावेत हे सांगणारा मी पहिला होतो. या देशात समान नागरी कायदा आणा, या देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा अशा २ मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण कराव्यात असं राज ठाकरेंनी सांगितले.

माझ्या भात्यातील बाण काढायला लावू नका!

लोकाना त् ं रासदायक ठरणारे मशिदीवरील भोंगे खाली उतरवा, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. हा प्रश्न धार्मिक नाही तर सामाजिक आहे. त्यामुळे न्यायालयाचा मान राखत राज्य सरकारने ३ मे पर्यंत भोंगे खाली उतरवावेत, अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालीसा लागणारच, असे ठणकावत या पुढे जाऊन मला माझ्या भात्यातील बाण काढायला लावू नका, असा इशाराही राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला.