ठाणे-रायगडातील भात खरेदी ८८ कोटींच्या घरात

शहापूर – पणन हंगाम २०२०/२१ मधील किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ठाणे व रायगड जिल्ह्यातील १३ हजार ५०३ शेतकऱ्यांकडून तब्बल ८८ कोटी ४० लाख ९८ हजार ३१३ इतक्या किमतीचे भात खरेदी करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने आपले धान्य विकावे लागू नये या उद्देशाने केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येते. तथापि राज्य शासनाने नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्थांमार्फत बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन, मुंबई व आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक यांच्यामार्फत वाजवी सरासरी गुणवत्तेच्या धान्याची आणि भरडधान्याची खरेदी करण्यात येते. या योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ९ तर मुरबाड तालुक्यातील ३ तसेच रायगड जिल्ह्यातील एक अशा एकूण १३ खरेदी केंद्रांवर भात खरेदी करण्यात आला. दरम्यान १३ हजार ५०३ शेतकऱ्यांकडून चार लाख ५५ हजार ७२०.७८ क्विंटल भात खरेदी करण्यात आला.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील खरेदी केंद्र –

१) वेहळोली – एक हजार २१८ शेतक-यांचे ४० हजार ९५४.८० क्विंटल

२) खर्डी – एक हजार ५८२ शेतक-यांचे ५७ हजार १३६.२० क्विंटल

३)मढ/अंबर्जे – एक हजार ७६९ शेतकऱ्यांचे ६५ हजार ४४४ क्विंटल

४)अघई – ८४२ शेतकऱ्यांचे २९ हजार ४४६ क्विंटल

५)सावरोली(सो) – एक हजार ४३७ शेतकऱ्यांचे ४७ हजार ९०५.२० क्विंटल

६)डोळखांब – ६४१ शेतक-यांचे १७ हजार ५७१.२० क्विंटल

७)आटगाव – एक हजार ३७७ शेतकऱ्यांचे ५१ हजार ७७३.६० क्विंटल

८)सापगाव – ९३१ शेतकऱ्यांचे ३० हजार २४२.६२ क्विंटल

९) मुगाव – ४८८ शेतकऱ्यांचे १३ हजार ६०६.९५ क्विंटल

तर मुरबाड तालुक्यातील

१) पाटगाव – २३९ शेतकऱ्यांचे सात हजार १८८.२५ क्विंटल

2) न्याहाडी – एक हजार २४० शेतकऱ्यांचे ३३ हजार ४८७.३६ क्विंटल

3)माळ – एक हजार ३३९ शेतकऱ्यांचे ४८ हजार ७७२ क्विंटल

तसेच रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सुगवे येथील ४०० शेतकऱ्यांचे १२ हजार १९२.६० क्विंटल भात खरेदी झाली आहे. दरम्यान चालुवर्षी उपप्रादेशिक कार्यालयाकडून ८८ कोटी ४० लाख ९८ हजार ३१३.२० कोटी रुपयांची भात खरेदी करण्यात आली.