भिवंडी : संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज भिवंडी ठाणे ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-नाशिक महामार्गालगत ठिकठिकाणी घोषणाबाजी करुन नरेंद्र मोदी माफी मागो आंदोलन करण्यात आले.
दुस-यावर बोट दाखवण्यापेक्षा स्वताची तीन बोटे हे आपल्याकडे असतात, हे त्यांनी विसरु नये..केंद्र सरकारने जर योग्य वेळी योग्य निर्णय घेतले असते तर आज कोरोना संसर्ग परिस्थिती नियंत्रणात असती. कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू उत्तरप्रदेशात झाले असून त्या ठिकाणी भाजपचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केलेले व्यक्तव्य चुकीचे असून त्याबबत लवकरात लवकर माफी मागावी अन्यथा हे आंदोलन अजून तीव्र होईल, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे. यावेळी ग्रामीण काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हजर होते.