समृद्धीचे काम वेगात सुरू; इगतपुरी ते आमने शेवटचा टप्पा

ठाणे ते नाशिक प्रवासाला ‘कायमची सुट्टी’?

ठाणे : सध्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू असून या टप्प्यामध्ये एकूण पाच बोगद्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. इगतपुरी ते आमने हा या मार्गावरील सर्वात महत्त्वाचा टप्पा असून, त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इगतपुरी या ठिकाणी असणारा आठ किलोमीटर लांबीचा बोगदा आहे.

या बोगद्याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा राज्यातील दुस-या क्रमांकाचा मोठा बोगदा असणार आहे. त्यामुळेच ठाणे ते नाशिक प्रवास करताना कसारा घाटातून आता प्रवास करावा लागणार नाही. याशिवाय, प्रवासात कसारा घाटदेखील टाळता येणार आहे.
समृद्धी महामार्गाचे काम सध्या खूप वेगात सुरू असून जवळपास ‘इगतपुरी ते आमने’ या शेवटच्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. या टप्प्याचे कामही पूर्ण होऊन या ठिकाणी नवीन वाहतूक सुरू होईल. इगतपुरीवरून ठाणे किंवा आमने गाठायला फक्त सव्वा तास लागणार आहे आणि ठाणे ते नाशिक प्रवास फक्त अडीच तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे,असे ‘एमएसआरडीसी’च्या सूत्रांनी सांगितले.

सध्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू असून या टप्प्यामध्ये एकूण पाच बोगद्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. इगतपुरी ते आमने हा या मार्गावरील सर्वात महत्त्वाचा टप्पा असून यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इगतपुरी या ठिकाणी असणारा आठ किलोमीटर लांबीचा बोगदा होय.
बारा किलोमीटरचा कसारा घाट असून तो पार करण्यासाठी एक तासांपेक्षा जास्त कालावधी लागतो. परंतु जेव्हा समृद्धी महामार्गाचा हा शेवटचा टप्पा सुरू होईल आणि या बोगद्याचे काम पूर्ण होईल. तेव्हा या बोगद्यातून अवघ्या आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा हे अंतर पार होणार आहे.

आता हा 76 किलोमीटरचा अंतिम टप्पा असून समृद्धी महामार्गावरील सगळ्यात मोठा आव्हानात्मक कामांचा हा टप्पा आहे. यामध्ये तब्बल 17 द-या असून आणि तब्बल 17 पूल या ठिकाणी उभारले जात आहेत. या सगळ्या पुलांची एकत्रित लांबी 11.5 किलोमीटर आहे.