कळवा-खारीगाव लिंक रोडसह दोन हजार कोटींचे प्रकल्प

ठाणे: जुना कळवा रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून कळवा खारीगांव लिंक रोडसह महत्वाकांक्षी दोन हजार कोटींच्या प्रकल्पांचे नियोजन करण्यात येणार आहे.

कळवा येथील जुन्या रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कळवा-खारीगाव लिंक रोडचे नियोजन करण्यात आले आहे. हा रस्ता ३.५ किलोमीटर लांबीचा आहे. यासाठी एमएमआरडीएने ४०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याचा डीपीआर एमएमआरडीएकडे महापालिकेने मंजुरीकरिता पाठविण्यात आला आहे. हा रस्ता तयार झाल्यानंतर कळवा नाका येथील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

घोडबंदर कोस्टल रोडचे यापूर्वीच नियोजन करण्यात आले असून यासाठी एमएमआरडीएने तेरा हजार कोटी.१८ लाखाचा निधी मंजूर केला आहे. हा कोस्टल रोड १३ किमीचा आहे. यामध्ये रस्त्याची रुंदी ४५ मीटर असणार आहे. तर ५.५ किमीचा लांबीचा हा रस्ता असणार आहे. हा कोस्टल रोड सीआरझेड क्षेत्रातून जात असल्याने तेवढा भाग एलिव्हेटेड करण्यात येणार आहे. हवाई दलाच्या दलाच्या अकबर कॅम्पमधील सुरिक्षततेच्या निकषांना बाधा निर्माण होऊ नये म्हणून त्या परिसरातील ४५० मीटर लांबाचा रस्ता हा भुयारी असेल. सध्या या प्रकल्पासाठी जागेचा सर्व्हे तसेच जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

बाळकूम फायर स्टेशन ते शीळ दिवा रोड अशा नवीन रस्त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. हा संपूर्ण रस्ता ३.५ किमीचा आहे. तर म्हातार्डीपासून काटई नाका हा प्रवास जलदगतीने व्हावा यासाठी म्हातार्डी ते काटई नाका रस्त्याचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. हा रस्ता ४.१ किमीचा आहे.