पंतप्रधान देशाचा असतो पक्षाचा नसतो

शरद पवारांकडून पीएम मोदींच्या भाषणाची चिरफाड

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरु यांच्यावर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाचार घेत त्यांच्या भाषणाची चिरफाड केली आहे. पंतप्रधान देशाचा असतो, तो एका पक्षाचा नसतो असे सांगत खडे बोल सुनावले. शरद पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नरेंद्र मोदींनी चुकीची व्यवस्था स्वीकारली असल्याचा घणाघात केला.

पीएम मोदींच्या भाषणाचा समाचार घेताना शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान देशाचे असतात. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान होते. नेहरूंनी देशाचा चेहरा बदलण्याचं काम केलं. त्यावेळी जवाहरलाल नेहरू आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. दिवंगत नेत्यांवर टीका योग्य नसल्याचे खडे बोल शरद पवार यांनी पीएम मोदींना सुनावले. मोदींचं भाषण ऐकून दु:ख झालं असल्याचे ते म्हणाले. इंदिरा गांधी असो, जवाहरलाल नेहरू यांचं प्रत्येकाचं देशासाठी विकासात योगदान आहे. नरेंद्र मोदींनी चुकीची व्यवस्था स्वीकारली आहे.