ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत कदम

ठाणे : ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदासह ११ पदांसाठी घेण्यात आलेली निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी पुन्हा एकदा वकील प्रशांत कदम हे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत.

ठाणे जिल्हा वकील संघटना पदाधिकारी निवडणुकीत अध्यक्षांसह सदस्यपद या ११ जागांसाठी तब्बल २३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. संघटनेच्या अध्यक्षपदासाठी प्रशांत कदम आणि मधुकर पाटील हे आमनेसामने होते. यामध्ये कदम यांना ९२४ तर पाटील यांना २९३ मते पडल्याने कदम यांचा ६४३ मतांनी विजय झाला आहे.

यापूर्वी याबाबतचे वृत्त प्रकाशित करताना नजरचुकीने अध्यक्षपदी राजाराम तारमळे असे छापून आले होते. त्याऐवजी ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी वकील प्रशांत कदम असे वाचण्यात यावे.