१७व्या शतकात महाराष्ट मध्ये ३ थोर पुरुष लाभले. संत तुकाराम, शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी. समाज सुधारणा, भक्तीचा प्रचार, व प्रसारद्वारे समाजात स्थेर्य , शांतता , एकोपा नांदण्यास कमालीची मदत झाली आहे. ह्या ईश्वर पेरीत व्यक्ती असल्याने साहजिकच त्यांच्या वर्तनात उक्ती व कृती अगदी ठासून भरलेली असल्याने त्यांचा शब्द न शब्द समाजाने आदराने स्वीकारला. त्यामुळे समाजातील भीती, नैराश्य,भीती, द्वेष, भांडणे मिटून समाजात स्थिरता आली. असा आपला इतिहास , साहित्य सांगते. समर्थ रामदास स्वमिंचाच फक्त येथे विचार करू या.
समर्थ रामदास स्वामींचा सारा जीवनकाल पाहता पहिली १२ वर्षे बालपण,नंतरची १२ वर्षे तपाचरण, पुढील १२ वर्षे भारत भ्रमण व नंतरचा उर्वरित काळ समाजासाठी पुर्ण पणे व्यतीत केलेला आहे भरपूर अभ्यास ,योग्य निरीक्षणे, अनुभव व श्री राम कृपा, बलोपासना,भक्ती च्या माध्यमातून .[कर्मयोग-भक्तियोग] समाजमनात बिमब्विला आहे.त्यातही उक्ती व कृती यांचा योग्य मेळ बसविल्याने स्वामींच्या उपदेशास भलतेच वजन प्राप्त झाले होते. त्यांचा शब्द श्रद्धेने समाजाकडून उचलेला गेला. दासबोध,मनाचे श्लोक आदी त्यांचे साहित्य आजही समाजाला तितकेच गरजेचे आहे त्यात वादच नाही.त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणून प्रपच -परमार्थ हा उपदेश अगदी आजच्या घडीला देखील तितकाच आचरणीयच खचितच आहे.
सामाजिक बांधिलकीचे तत्त्व सभोवताली प्रकर्षाने दृष्टीस पडत असते. आपापल्या कर्म्भोगानुसार समाजात दु;ख, दारिद्र्य, रोग, व्याधी, ई. ग्रस्त समाज दिसतो. त्यावेळी संपन्न समाज घटकाने दुर्बल समाज गटास सहाय करून संपन्नतेची बिघडलेली दरी कमी करण्याचा प्रयत्न करावा. त्यांचे दु;ख कमी करण्याचा संपन्न गटाने आवश्य प्रयत्न करावा. त्यामुळे दुखी ,दुर्बल जीवाच्या चेह-यावर दिसणारा आनंद, समाधान म्हणजेच ती ईश्वरी सेवा असते. अनेक समाज धुरीनांचा आदर्श आपल्यापुढे नक्कीच आहे. तोच मोठा परमार्थ आहे. रक्तदान, विद्यादान, अवयव दान ,द्रव्य दान ,वस्त्र दान ई.ई.समाजात विसंवाद ,भांडणे,अपशब्द,ई.ची जागा सुसंवाद,व गोड बोलण्याने घेतली तर ख-या अर्थाने समाजात प्रेम,जिव्हाळा, ई.नी शांती लाभेल.
सर्वेपि सुखिन सन्तु व हेची दान देगा देवा ह्या संतांच्या वैश्विक पार्थना म्हणजे परमार्थाचा परमोच्च बिंदू च…!
– रामकृष्ण विनायक अभ्यंकर, २/४६ भक्तियोग सोसा. परांजपे नगर, वझिरा नका , बोरीवली प. मुंबई ४०००९१, मोबा.९८१९८४४७१०