सध्या एका मराठी वेब सीरिजची प्रचंड चर्चा सुरू आहे. रानबाजार असं या वेब सिरीजचं नाव असून त्याचा टिझर वाऱ्यासारखा पसरत आहे. प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांच्या बोल्डनेसमुळे या सध्या वातावरण तापलं आहे.
मुंबई: इंग्रजी आणि हिंदी वेब सीरिजमध्ये बोल्डनेस काही नवनी नाही. बोल्डनेसमुळे अनेक सीरिज चर्चेत आल्या. या सीरिजच्या यादीत आता एका मराठी वेब सीरिजचं नाव घेता येईल. या सीरिजचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. तेव्हापासूनच सोशल मीडियावर या टिझरची प्रचंड चर्चा आहे. या सीरिजचं नाव आह रानबाजार.
https://www.instagram.com/tv/Cdnu-PAAqmv/?utm_source=ig_web_copy_link
रानबाजारचे दोन टिझर नुकतेच शेअर करण्यात आले.वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’ असं म्हटलं गेलं. या सीरिजचा विषय आण टिझर दोन्हीही प्रचंड बोल्ड आहेत. मराठी वेब विश्वात पहिल्यांदाच इतका बोल्डनेस दाखण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय. अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांच्या या सीरिजमध्ये मुख्य भूमिका असणार आहेत.
शेअर करण्यात आलेल्या टिझरमध्ये तेजस्विनी विवस्त्र होताना दाखवण्यात झाली आहे. तर प्राजक्ता प्रणय प्रसंग करतानाचा सीन आहे. इतक्या बोल्ड टिझरवर चर्चा आणि ट्रोलिंग झाली नसती तरच नवल.
https://www.instagram.com/p/CdkYOFWl_Qs/?utm_source=ig_web_copy_link
रानबाजारचा टिझर पाहून नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनीकौतुक करत मराठी सिनेसृ्ष्टीतील या धाडसी प्रयोगाचं कौतुक केलंय तर बऱ्याच जणांनी ट्रोल देखील केलं आहे.