२२ नर्तकी, व्यवस्थापकासह वेटर व ग्राहकांवर कारवाई
कल्याण : कल्याण पश्चिम परिसरातील रामबाग येथील ताल बारवर महात्मा फुले चौक पोलिसांनी धाड टाकून नुकतीच मोठी कारवाई करण्यात आली.
याबाबत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई दिपक थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये व्यवस्थापक अरूण शेटट्टी, रोखपाल लवकुश शर्मा, म्युझिक ऑपरेटर संजय कल्याणकर, पुरूष वेटरांमध्ये आदर्श गुप्ता, मंजा गोवडा, नागराज गौडा व योगेश शिर्के यांचा समावेश आहे. तसेच नर्तकीवर पैसे उधळणाऱ्या १५ ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले. याशिवाय अश्लील हावभाव व तोकडे कपडे परिधान करून ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या २२ नर्तकी व महिला गायक यांना देखील ताब्यात घेण्यात आले.
महिला पोलीस उपनिरीक्षक अस्लेशा पाटगे, प्रतिभा माळी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरीक्षक ढोके, (मानपाडा पोलीस स्टेशन), पोलीस विकास मडके, पोलीस हवा. पोलीस नाईक सूर्यवंशी, पोलीस शिपाई खुशाल नेरकर, राहुल शिंदे, अमित शिंदे यांनी ही कामगिरी केली.