मीरारोड: नवघर पोलीस ठाण्यात तक्रार करायला आलेल्या महिलेबरोबर ओळख निर्माण करून त्याच पोलीस ठाण्यात असणाऱ्या पोलिसाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. त्या पोलिसाला अटक करून न्यायालयात हजर केले असता १० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीत राहणारी २७ वर्षीय महिला पोलीस ठाण्यात घरगुती भांडणातून तक्रार करायला गेली होती. त्यावेळी एका पोलिसांशी ओळख तिची झाली. त्यानंतर पोलिसांनी तुमचे भांडण सोडवून देतो असे सांगितले. त्यावेळी तिला भाईंदर रेल्वे स्टेशन येथे घेऊन गेला व तिला विश्वासात घेत नंतर उत्तन येथील धारावी मंदिर येथे घेऊन गेला. त्यानंतर पूर्ण प्रकरण निट समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्या पोलिसाने पीडित महिलेला माझ्या घरच्यांशी ओळख करून देतो असे सांगून गोल्डन नेस्ट सर्कल येथे घेऊन गेला. त्या पीडित महिलेच्या समंतीशिवाय तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला, अशी तक्रार नवघर पोलीस ठाण्यात ढोले याच्या विरोधात केल्यानंतर त्याच्या विरोधात भादवी ३७६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सहायक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले, नवघर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे हे अधिक तपास करत आहेत.