गृहमंत्री वळसे-पाटील यांचा थेट इशारा
मुंबई : राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील भूमिके वरून ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करत ३ मेपर्यंत ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाष्य करत मनसेला थेट इशारा दिला आहे. राज्यातील परिस्थिती बिघडू देणार नाही. पोलीस तयार आहेत, असे दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
दिलीप वळसे-पाटील यांनी राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत केलेला दावा खोडून काढला असून, मशिदींवरील भोंग्यांना विरोध करताना ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो, त्यामध्ये रात्री १० ते सकाळी ६ या काळात कोणत्याही ठिकाणी लाऊडस्पीकर्स वाजवू नयेत, असे म्हटले
आहे. ज्या ठिकाणी परवानगी घेऊन भोंगे लावले आहेत, े काढण्याचा प्रश्नच येत नाही, असे दिलीप-वळसे पाटील यांनी नमूद के ले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणारे लोक आहोत. कोणत्याही परिस्थितीत राज्यात वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण करून देणार नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणारे लोक आहोत. आमच्यासाठी सर्वजण सारखे आहेत. पोलीस सज्ज असल्यामुळे कोणताही तणावाची परिस्थिती उद्भवणार नाही, असा विश्वास दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त के ला आहे. तसेच किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या दिलासाबाबत बोलताना, विशिष्ट पक्षाच्या लोकांना दिलासा मिळत असेल तर आश्चर्य वाटणे साहजिक आहे. अशा परिस्थितीत हा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो. त्यामध्ये चुकीचे काहीही नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, अखंड भारताच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी के लेल्या विधानाला संजय राऊत यांनी दिलेल्या समर्थनाबाबत विचारले असता, भारत हा वेगवेगळ्या जातीधर्माच्या लोकांनी मिळून बनलेला देश आहे. त्याच्या विघटनाचा प्रयत्न करू नये. तसेच अखंड भारताबाबत संजय राऊत यांची नेमकी आणि
सविस्तर भूमिका काय आहे, हे मी त्यांना भेटल्यावर विचारेन, अशी प्रतिक्रिया दिलीप-वळसे पाटील यांनी दिली आहे.