होळी-रंग पंचमीवर पोलीस आणि कॅमेऱ्यांची नजर

ठाणे: होळी आणि रंगपंचमीच्या सणाच्या दरम्यान महिलांवर पाण्याचे फुगे, रंग फेकणाऱ्या तसेच महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर साध्या वेषातील पोलीस आणि सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पुढील आठवड्यात ६ तारखेला होळी, सात तारखेला धुलीवंदन सण साजरे केले जाणार आहेत. हा सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय बाहेर पडत असतो. त्या दरम्यान कोणत्या प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय परिससरात तीन अपर पोलिस आयुक्त, सात पोलिस उपायुक्त, ११ सहाय्यक पोलीस आयुक्त, ४०० पोलीस अधिकारी, तीन हजार पुरुष पोलीस शिपाई, महिला पोलीस तसेच पाचशे वाहतूक शाखेच्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.