निवडणुका म्हणजेच लोकशाही नाही !

वैशाख वणवा पेटला असताना, वीज आणि पाणीटंचाईबरोबर महागाईच्या चटक्यांनी शरीराची लाहीलाही होत असताना समाजात अचानक प्रगल्भतेचे आश्वासक वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सारेच काही हाताबाहेर गेलेले नाही आणि सार्वजनिक सभ्यता, सौहार्द आणि सामंजस्याचे अं तिम पर्व सुरु झाले आहे. असे मानण्याची गरज नाही. एका सुसंस्कृत समाजव्यवस्ला घरघर लागल् थे याचे वर्तन राज्यकर्त्यांपासून माध्यमांपर्त यं कार्यरत असणार्‍या मंडळींकडून खुलेआम होत असताना साहित्य संमेलनानिमित्त अध्यक्ष भारत सासणे यांच्यासह परिसंवादात सहभागी झालेल्या विचारवंतांपर्यंत यांनी जी भूमिका मांडली आहे त्यावर आत्मपरीक्षण आणि आत्मबोध घेण्याची आशादायक संधी निर्माण झाली आहे. या संमेलनात के वळ साहित्यिक मूल्यांवर चर्चा सीमीत राहिली नसून सामाजिक मूल्यांचा जो झपाट्याने र्हास सुरु आहे त्यावर गंभीर चर्चा आणि विवेचन झाले आहे. थोडासा वेळ काढून राजकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि प्रशासकीय मंडळींनी संमेलनाच्या मंडपातून बाहेर पडणार्‍या उद्गारांचा आरसा म्हणून वापर करावा असे वाटते. श्री. सासणे यांनी विद्यमान काळ कठीण आहे हे सूत्र पकडून आं तरिक अस्वस्थतेचा मुद्दा उपस्थित के ला आहे. लेखक मंडळींच्या निर्मिती प्रक्रियेत या अस्वस्थतेचा भाग प्रामुख्याने असतो. परंतु समाजात याबाबत जी बधिरता आली आहे ती विविध साहित्य प्रकारांची निर्मिती करणार्‍या मंडळींत येऊ नये असे त्यांना वाटते. जरी त्यांनी या वर्गात पत्रकारांचा आणि माध्यमवीरांचा उल्लेख के ला नसला तरी ही अस्वस्थता त्यांनी अव्रता कामा न हे ये. सर्वसामान्य माणसांच्या छोट्या- छोट्या लढायांची नोंद घेणे हे जीवनदर्शी साहित्याची ओळख ठरु शकते. आजच्या साहित्यातून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेला आहे अशी खंत व्यक्त करणाऱ्या श्री. सासणे यांना साहित्य अधिक मनोरंजनपर होत चालल्यामुळे तर चेहरे धुसर होत नसतील असा प्रश्न पडतो. जीवन हे साहित्यातून प्रतिबिंबीत व्हायला हवे असा आग्रही ते धरतात. सध्या माणसे संभ्रमावस्थेत असल्याचे श्री. सासणे यांचे मत आहे. प्रत्येक जण प्रवास करतोय पण आंधळेपणाने आणित्यामुळे एका बधिरावस्त समाज लपेट थे ून गेला आहे. भ्रष्टाचाराचा तिटकारा आलाय, किळसवाणी अनैतिकता त्याला चिकटून।बसली आहे, बौध्दिक विकृतीने समाजमनाचा ताबा घेतला आहे. उद्याचा दिवस उजाडणारच नाही अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. साहित्य संमेलने चुकीच्या कारणांसाठी गाजत आली आहेत. अनेकदा आयोजकच या चुकांचे वादात कसे रुपांतर होईल आणि संमेलनाचे आणि त्यांचेही महत्व वाढेल अशी योजना करतात की काय असे वाटून जाते. पण अशा संमेलनात विचारांच्या धनाची मुक्तपणे उधळण होत असते. त्याचा उपयोग बौध्दिक प्रगल्भता वाढवण्यासाठी करण्याची अपेक्षा असते. श्री. सासणे यांनी अशी नामी संधी समाजजीवनात वावरणार्‍या प्रत्येकाला दिली आहे. आपल्याला साहित्यातले काही समजत नाही असे बोलून नामानिराळे होणार्‍यांनी तर या विचारधनाचे चार थेंब सेवन करायला हवेत. आरोप-प्रत्यारोप, वाद-गदारोळ, शिव्याशाप आणि एकमेकांना सातत्याने आव्हान देण्याची भाषा करण्यात मशगुल नेत्यांनी तर साहित्य संमेलनात
होणार्‍या विचारमंथनाचा लक्षपूर्वक विचार करायला हवा. समाजमन ताळ्यावर आणण्याची क्षमता साहित्यात असते. भरकटलेल्या विचारांना विधायकतेच्या आणि लोककल्याणाच्या कामांत जुंपण्याची क्षमताही साहित्यात असते. आत्मविश्वास गमावलेल्या आणि पराभूत मानसिकतेत खितपत पडलेल्या समाजाला वास्तविक सावरण्याचे काम नेत्यांनी करावयाचे असते. परंतु समाज जितका निष्प्रभ !