‘अजब हे मोठे’ बालनाट्य अव्वल

ठाणेवैभव’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नाट्यलेखन स्पर्धा

ठाणे : ‘ठाणेवैभव’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षकांसाठी नाटक-एकांकिका, बालनाट्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

शिक्षक हे विद्यार्थ्यांना योग्य मूल्यांमध्ये घडवतात. नाटकाच्या रूपात चांगले लिखाण मुलांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकू शकते या उद्देशाने नाटक-एकांकिका नाट्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेला विविध शाळेतून अनेक शिक्षकांनी भरघोस प्रतिसाद आला. त्यातून आता या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कुलच्या डॉ. दीप्ती जोशी यांनी लिहिलेल्या ‘अजब हे मोठे’ या बालनाट्याला मिळाला आहे. सरस्वती विद्यालय, राबोडी स्कुलच्या माधवी फडणवीस यांच्या ‘धरती सांगे तुम्हाला’ या बालनाट्याला आणि नालंदा स्कुलच्या वैशाली थळे यांच्या ‘कुर्यात सदा प्रकृती रक्षणम्’ या बालनाट्याला द्वितीय क्रमांक विभागून मिळाला आहे. आनंद विश्व गुरुकुल स्कुलच्या लीना भास्कर यांच्या ‘शूरा मी वंदिले’ या बालनाट्याला आणि सी. पी. गोयंका स्कुलच्या ट्रिपरी शुक्ला यांच्या हिंदी नाटकाला तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे.

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ शुक्रवार २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ठाणेवैभव कार्यालय, अ‍ॅडीजोन, अल्मेडा सिग्नलजवळ, पिनॅकल हॉस्पिटल समोर, एलबीएस मार्ग, ठाणे (प) येथे आयोजित करण्यात येणार आहे.